ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कुणी म्हणतं फसवाफसवी, कुणी म्हणतं प्रत आलीच नाही; भुजबळांच्या राजीनाम्याच्या दाव्यामागची इनसाइट स्टोरी

मुंबई ओबीसी समाजाचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी १६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र या दाव्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यात विरोधी पक्षांसह शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांचा समावेश आहे. जितेंद्र आव्हाड – छगन भुजबळांनी जर राजीनामा दिला आहे तर सरकारी गाडी, बंगला असं कसं […]

लेख

मराठवाड्यात ओबीसी नाराज 

X: @therajkaran आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे अशी मागणी पुढे आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून (reservation to Maratha community from OBC quota) आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी समाज एकवटला होता. एकीकडे सबंध महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सभा तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र शोध बातमी

Impact : भुजबळ भाजपच्या वाटेवर? ‘द राजकारण’नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा

मुंबई ‘द राजकारण’ ने काल १ फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याला दुजोरा देणारं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुढील लोकसभा निवडणूक भाजपमधून लढवणार असल्याच्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार गटात अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. मराठा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? चर्चेत असलेले भुजबळ नवा राजकीय बॉम्ब टाकणार!

मुंबईX : @MeenalGangurde8 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र लोकसभा निवडणूक आणि पक्षांतर्गत अस्वस्थतेमुळे काही उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, असेही आडाखे बांधले जात आहे. यात छगन भुजबळांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ हे अजित पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत धुसफूस, भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची मागणी मान्य केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असला तरी ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही – छगन भुजबळ

X : @NalavadeAnant मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि सत्तारूढ पक्षातील अजित पवार गटाचे मंत्री व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत असताना सोमवारी भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्ही नेत्यांना अंगावर घेतले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘मला मंत्रिपदावरून काढले तरी हरकत नाही, अशा संतप्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार : छगन भुजबळ 

X: @NalavadeAnant मुंबई: सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi caste certificate to Maratha community) देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे, त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगेंना दिलेला अध्यादेश नव्हे, मसुदा!’ मराठा आरक्षणाच्या गुलालाला छगन भुजबळांचं आव्हान

मुंबई आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांच्या समुद्रात पोहोणाऱ्या मराठा समाजाला आता १७ टक्क्यांमध्ये विहिरीत पोहावं लागणार आहे. झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. मंत्रिमंडळात जाताना कुणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ घेत असतो, अशा शब्दात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर संताप व्यक्त केला. जरांगे पाटलांना दिलेला जीआर की केवळ एक सूचना आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मंत्री छगन भुजबळ यांना ध्वजारोहणाचा मान नाकारला? वडेट्टीवारांकडून राज्य सरकारवर टीका

मुंबई प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री, मंत्री यांच्या नावाचे संबंधित जिल्ह्यांच्या नावासह परिपत्रक काढले आहे. यामध्ये मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं नाव नसल्याचं सांगितलं जात आहे. छगन भुजबळांना ध्वजारोहणाचा मान नाकारल्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरमरीत टीका केली आहे. ‘दोन वेळा उपमुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एलपीजीसह पेट्रोलजन्य पदार्थांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात : मंत्री छगन भुजबळ

X : @therajkaran मुंबई राज्यातील वाहतूकदरांच्या संपामध्ये पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी वाहतूकदारही सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पेट्रोल, डिझेल व एल.पी.जी. चा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व […]