ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी ; माढ्यात तीन बडे नेते ‘शिवरत्नवर’ एकत्र येणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

दुसरं नेतृत्व उभं राहू नये म्हणून सांगलीत विशाल पाटलांचा गेम? कोणी फिरवली प्यादी, कोण पडलं बळी?

मुंबई- सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसची जागा असलेल्या या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळं सांगलीती काँग्रेस नेते अस्वस्थ झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची दीड ते दोन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विशाल पाटलांना धक्का ; महेश खराडेंना उमेदवारी जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha constituency) ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना या मतदारसंघात धक्का बसला होता . आता पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांना फटका बसला आहे . कारण या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा भाजपला धक्का ; माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil )यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादीत दाखल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसमधील बंडोबा 24 तासांत झाले थंडोबा, सांगली आणि मुंबईतील नाराज नेत्यांचे सूर नरमले

मुंबई- मविआच्या जागावाटपावर नाराज झालेल्या सांगली आणि मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांनी नाराजीची आणि बंडाची भाषा सुरु केली होती. मात्र दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांनी या नेत्यांचे कान पिळल्यानंतर नेत्यांच्या तोंडची बंडाची भाषा बदलल्याचं दिसतंय. सांगलीत काय घडलं सांगलीत चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील हे जाहीर झाल्यानंतर, तिकिटासाठी आग्रही असलेले आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सांगलीपाठोपाठ उत्तर मुंबईतही मविआत उमेदवारावरुन चुरस, घोसाळकर पंजावर लढणार की मशालीवर?

मुंबई – महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालं असलं तरी वाद संपण्याचं चिन्ह दिसत नाहीये. सांगलीत काँग्रेस नेते विश्नजीत कदम आणि विशाल पाटील यांची नाराजी कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईतील काँग्रेसला सोडण्यात आलेल्या दोन जागांवर उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतून अद्याप कुमआला उमेदवारी द्यायची याचा निर्णय झालेला नाही. उत्तर मुंबईत काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याचं सांगण्यात येतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा धुळे अन जालण्यात डाव ; भाजपच्या दोन ताकदवान नेत्यांविरोधात शोभा बच्छाव , कल्याण काळेंना उमेदवारी

मुंबई : काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीसाठी धुळे आणि जालन्यामध्ये भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे . काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांना तर धुळ्यातून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली आहे .त्यामुळे आता कल्याण काळे भाजपच्या रावसाहेब दानवेंशी (Raosaheb Danve) निवडणुकीच्या रिंगणात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसची चौथी यादी, आतापर्यंत 15 उमेदवार जाहीर; दोन नावं अजूनही गुलदस्त्यात

मुंबई : काँग्रेसची चौथी यादी समोर आली असून यामध्ये दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये जालना आणि धुळे लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून १५ जागांवरुन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील दोन जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई मध्य या मतदारसंघातील उमेदवारांची नावं अद्यापही गुलदस्त्यात आहेत. चौथ्या यादीनुसार, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“भाजपकडून काँग्रेसला टार्गेट केलं जातंय पण .. आम्ही पण कोल्हापूरचेच …” ; आमदार सतेज पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha )महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) तर महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यात लढत रंगणार आहे . या निवडणुकीसाठी दोन्हीकडून जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावला असून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज […]