मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार याकडं सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. महायुती विरुद्ध मविआ अशा या लढतीत राज्यभरात प्रचार शिगेला पोहचला असला, तरी नक्की यश कुणाला मिळणार याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. अशात एका वृत्तपत्रानं केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांपुढील महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे.
काय आहे मतदारांसाठी महत्त्वाचा मुद्दा
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मतदारांना अ्नेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता, या प्रश्नावर ५२ टक्के मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे.
चर दुसरीकडे ३३ टक्के मतदारांनी बेरोजगारी ही सर्वाधिक चिंतेची बाब असल्याचं सांगितलेलं आहे.
मतदानाचे विक्रम यावेळी मोडले जाणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशात ६७ टक्के मतदान झाले होते. भारतीय लोकशाहीतील हे सर्वाधिक मतदान होतं. यावेळी हाही विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.
या सर्वेक्षणात मतदारांना मतदानाबाबत विचारणा केली असता ९६ टक्के मतदारांनी मतदान करणार असल्याचं सांगीतलंय. मतदान करणार नाही असं सांगणाऱ्यांत महिला आणि १८ ते ३० वयोगताली काही तरुणांचा समावेश आहे.
मोदींसाठी काय आहेत जमेच्या बाजू
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली १० वर्ष सत्तेत आहेत. त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, त्याबाबतही मतदारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
१. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची इच्छा
२. भारताला विश्वगुरु करण्यासाठी मोदीच योग्य
३. देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मोदीच सक्षम
४. राम मंदिराप्रमाणे इतरही मंदिरांचा जीर्णोद्धा होण्याची शक्यता
५. पाकिस्तान आणि चीनला तोंड देण्यासाठी मोदींचं नेतृत्वच योग्य
तर मोदींच्या विरोधातल्या बाबीही मतदारांनी अधोरेखित केलेल्या आहेत.
१. वाढती बेरोजगारी
२. महागाई
३. हुकूमशाहीची भीती
४. शेतकऱ्यांमधील अस्वस्थता
५. मंदिरांपेक्षा विकासाची गरज
हेही वाचाःशरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते 14 वर्षांनंतर एकत्र, आज अकलूजमध्ये ‘डिनर डिप्लोमसी’