नवी दिल्ली : आज 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ या नावाने भारतीय जनता पक्षाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपतील मोठे नेते उपस्थित आहेत.
भाजपच्य 2024 च्या संकल्पपत्रात विकसित भारताचे मजबूत स्तंभ युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब आणि शेतकरी यांना सशक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, येणाऱ्या पाच वर्षांपर्यंत मोफत रेशनची योजना कायम राहणार आहे.
- समान नागरी कायदा लागू करणार
- वन नेशनल वन इलेक्शन
- तृतीयपंथीयांना नवी ओळख मिळवून देणार, त्यांच्यासाठी निवास योजनेची सोय
- पाईपलाइनमार्फत स्वस्त गॅस प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवणार
- ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
- आयुष्यमान भारत योजनेनुसार ५ लाखांपर्यंत उपचार
- जनऔषध केंद्रावर ८० टक्क्यांपर्यंत सूट
- मुद्रा योजनेअंतर्गत २० लाखांपर्यंत कर्ज देणार
- छोट्या उद्योगांना प्रोत्साहन
- ३ कोटी गरीबांना पक्की घरं
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- मोफत विजेसह वीज उत्पादनाची योजना आणणार
- ७० वर्षांवरील सर्वांना आयुष्यामान योजनेअंतर्गत आणणार आणि त्यांना ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार
- सर्वात जुन्या तमिळ भाषेची वैश्विक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नवे उपक्रम सुरू करणार
- नॅनो युरियाच्या वापरावर भर
- प्रत्येक घरात नळाने पाणी
- पर्यटन क्षेत्रासाठी विविध योजना, इको टुरिझम आणि होम स्टे आदी योजनांवर भर, होम स्टेसाठी महिलांना सरकारकडून मदत पुरवणार
- मुद्रा योजनेतून कर्जाची मर्यादा १० लाख वरुन २० लाख करणार