ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत आप-काँग्रेसचं ठरलं, या राज्यांमध्येही दोघे एकत्र निवडणुकीच्या रणांगणात

नवी दिल्ली दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी जागा वाटपाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक म्हणाले, दिल्ली लोकसभेच्या ७ जागा आहेत. यातील आप ४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. यात नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली अणि पूर्ण दिल्ली या मतदारसंघांचा समावेश आहे. काँग्रेस तीन जागांवर निवडणूक […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मुरादाबादमध्ये राहुल-प्रियांका यांची एकत्र भारत जोडो न्याय यात्रा, स्वागतासाठी मोठी गर्दी

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात केली आहे. दोन्ही भाऊ-बहीण शनिवारी मुरादाबादमध्ये काँग्रेसच्या यात्रेत एकत्र दिसले. मुरादाबादमध्ये जनतेने मोठ्या संख्येने राहुल आणि प्रियांका यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे. पश्चिम यूपीमध्ये न्याय यात्रा सुरू करण्यासाठी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या निधनाने महाराष्ट्र भावुक, नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झालं. त्यांना काल २२ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रगल्भ नेतृत्व हरपल्यामुळे महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी मनोहर जोशींची आठवण व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

दिल्लीत काँग्रेसचा हात ‘आप’सोबत, 4-3 चा फॉर्म्युला अखेर ठरला!

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावर एकमत झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक दोघेही एकत्र लढणार आहेत. आपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाबाबत काँग्रेस आणि आपमध्येही मतभेद दूर झालेले आहेत. लवकरच दोन्ही पार्टी अधिकृतपणे जागावाटपाची घोषणा करतील. या आठवड्याच्या शेवटपर्यंत दोन्ही पार्टी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर हायकोर्टाने मैतेई समाजाच्या आरक्षणाचा परिच्छेद हटवला, जातीय हिंसाचाराचं ठरलं होतं कारण

X: @therajkaran नवी दिल्ली : मणिपूर उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमाती (ST) मध्ये करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. २७ मार्च २०२३ ची सूचना राज्यात जातीय हिंसाचाराच्या उद्रेकाचं कारण असल्याचे म्हटले जात होते. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यात जातीय हिंसाचाराने उग्र स्वरूप धारण केले होते. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 200 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआमधील जागा वाटप कधी? रमेश चेन्नीथलांनी सांगितली नेमकी तारीख!

मुंबई उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात लोकसभा जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा गुंता सुटणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात तिरंगी लढत, सपा-काँग्रेस युती बसपासाठी धोक्याची?

लखनऊ उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागावाटपावर ठराव झाला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून यातील ८० पैकी १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहेत. उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे, जिथं इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकले आहे. अद्याप पश्चिम बंगाल, बिहार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे महायुती सरकारचे पाप’ – नाना पटोले

मुंबई पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई ‘केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’, अशी खरमरीत टीका […]