ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांच्या पुस्तकाने खळबळ

नवी दिल्ली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर विविध आरोप केले जात असतानाच त्यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या पुस्तकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज दिल्लीत रणजीत सावरकरांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकान नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा करण्यात आला आहे. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाच्या विजयी सभेत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर का?

धुळे मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. अद्याप सरकारने अध्यादेश काढला नसून हा केवळ मसूदा आहे, याविरोधात मोठ्या संख्येने हरकती पाठवल्या जातील असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता याविरोधात काँग्रेसकडूनही टीका केली जात आहे. संभ्रम निर्माण करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही, सरकारने खुलासा करावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, प्रजासत्ताक दिनी धक्कादायक Video समोर

पंढरपूर महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने हातात एक बोर्ड घेतला आहे. या फोटोवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसेचा फोटो आहे. हातात त्यांचे फोटो घेऊन तरुण नथुराम गोडसेची जयची घोषणा देत आहे. त्याच्यासोबत जमाव असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंढरपूरातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रकाश आंबेडकरांचा मविआच्या बैठकीत जाण्यास नकार, नाना पटोलेंनाही सुनावलं

मुंबई वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जाण्यास नकार दिला आहे. याचं स्पष्टीकरण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. याशिवाय या पत्रात त्यांनी नाना पटोलेंनाही सुनावलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज दुपारी एक पत्र सोशल मीडियावरुन शेअर केलं होतं. यात त्यांनी प्रकाश आंबेडकरांना आज मविआच्या बैठकीत उपस्थित राहण्याचं निमंत्रण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोलेंची जहरी टीका

मुंबई मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

लोकसभा जागावाटपाचं गणित सुटणार? महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक

मुंबई लोकसभा जागावाटपासंदर्भात मुंबईत आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कोण किती जागांवर निवडणूक लढवणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. वंचित बहुजन आघाडी मविआत आल्यास हा गुंता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. मविआच्या या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात, ढोंगी सरकारचे पितळ उघड’; वडेट्टीवारांचा मोठा आरोप

मुंबई महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजावाजा करत आहे. परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घातल्या आहेत. सरकारला पाठिंबा दिलेले लोकप्रतिनिधी या देवस्थान जमीन घोटाळ्यात सामील आहेत. सरकार अशा घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. देवस्थान जमिनींचे प्रश्न सोडवताना सरकार भूमाफीयांचे हितसंबंध जोपासत आहे. यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचे सिध्द होत आहे,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीचा अपघात

कोलकत्ता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे, या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. वर्धमानमधील एक बैठक संपवून त्या परतत असताना हा अपघात झाला. अचानक ब्रेक लागल्यामुळे त्यांच्या कपाळाला जखम झाली आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गाडी जलद गतीने जात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

तरं त्यांची अवस्था अहंकारी रावणासारखी होईल…..?

X: @therajkaran मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका…..! ज्यांनी आपल्या राक्षसी आकांशेपोटी वंदनीय बाळासाहेबांचे विचार विकले, विचारांना तीलाजली दिली, ज्यांनी आपल्या हयातीत काँग्रेसला कधीच जवळ घेतले नाही, त्याचं काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता काबीज करून मुख्यमंत्री पद उपभोगले ते पाहता जी अवस्था अहंकारी रावणाची झाली तीच अवस्था यांची होईल, अशी जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रामभक्तांच्या सोहळ्यात अशोक चव्हाण यांची गुगली

By Abhaykumar Dandge X: @therajkaran नांदेड: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरात मोठे बॅनर लावून राम भक्तांना शुभेच्छा दिल्या. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात राम भक्तांना शुभेच्छा देऊन अशोक चव्हाण यांनी एक राजकीय गुगली टाकली. एकीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी अयोध्येत रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याला जाण्याचे टाळलेले असताना माजी मुख्यमंत्री व […]