ताज्या बातम्या महाराष्ट्र

सरकारवरच ३०२ चे गुन्हे दाखल करा – काँग्रेसची मागणी

Twitter : @NalavadeAnant मुंबई ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना असून राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जातनिहाय जनगणनेचा कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर करावा -विजय वडेट्टीवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न  प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे.  त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जातनिहाय जनगणना […]

महाराष्ट्र

भाजप प्रवेशास नकार?; काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटलांच्या सूतगिरणीवर पहाटे कारवाई

Twitter : @SantoshMasole धुळे मुंबईतील कॉँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्यांमार्फत जंग-जंग पछाडले जात होते. मात्र, त्यास प्रत्येक वेळी ठाम नकार दिल्यानेच कुणाल पाटील हे अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर तपासणी पथकाने आज पहाटे छापा घातला. सूतगिरणी व्यवस्थापनासह काही भ्रमणध्वनी […]

ताज्या बातम्या मुंबई

निर्मल बिल्डिंगमधून कंत्राट वाटप – नाना पटोले यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्य शासनाने शासन आदेश काढून मंत्रालयातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर आणि वेगवेगळ्या विभागात जाण्यावर बंधने आणली आहेत. याबाबत टीका करताना नाना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप आमदार नितेश राणेंना काय सुनावले?

Twitter : @therajkaran मुंबई विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री असतील असे विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. वारंवार पक्षस बदलणारे नितेश राणे यांनी आधी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नये, मी आहे त्याच पक्षात समाधानी आहे, अशा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपने पत्रकारांची प्रतिमा “धाब्या”वर बसविली – अनंत गाडगीळ

Twitter : @therajkaran मुंबई पत्रकारांना धाब्यावर न्या, चहा प्यायला न्या, असा सल्ला देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करतांना, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ (Congress Leader Anant Gadgil) यांनी आरोप केला की, केन्द्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर […]

ताज्या बातम्या मुंबई

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मनपाने ताब्यात घ्यावे – राजेश शर्मा

Twitter : @AnantNalavade मुंबई अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल (Seven Hills Hospital, Andheri) आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याने हे हॉस्पिटल खाजगी कंपनीच्या घशात घालण्याऐवजी मुंबई महापालिकेनेच ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी येथे केली. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. सध्या […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव – अशोक चव्हाण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याचा दावा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही….!

Twitter : @NalavadeAnant मुंबई: केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिल्याची घणाघाती टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धमकीचा इशारा असून पत्रकारांनी, पत्रकार […]