ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांची भाजपविरोधात खेळी ; फडणवीसांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीत जाणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूरमधून भाजपला मोठा धक्का दिला आहे .सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू संजय क्षीरसागर ( Sanjay kshirsagar) शरद पवार गटात (Sharadchandra Pawar group )प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तुतारी कोणाची ? बारामतीत अपक्ष उमेदवाराला “तुतारी ” ; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

मुंबई : राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच आता सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ( Baramati Lok Sabha Constituency ) उमेदवारांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोणतीही निवडणूक बिनविरोध होण्यास विरोध, सत्यजीत तांबे यांचं भाजपावर टीकास्त्र

मुंबई- सूरतमध्ये भाजपाचे लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्यानं नवा वादंग निर्माण झालेला आहे. सूरतचे काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभोणी यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचं समोर आलंय. भाजपाकून मिळालेल्या निर्देशानुसार कुंभोणी यांनी प्रदेश काँग्रेसला अंधारात ठेवत पावलं उचलली, त्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज बादल झाल्याचं सांगण्यात येतंय. कुंभोणी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात अनुमोदक म्हणून कार्यकर्ते आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘काँग्रेस जनतेची संपत्ती घुसखोरांना वाटेल, मंगळसूत्र घेतली जातील’, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर टीकेची झोड

नवी दिल्ली- देशात काँग्रेसचं सरकार आलं तर संपत्तीचं फेरवाटप करण्यात येईल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बंसवारा येथील प्रचारसभेत केलं. काँग्रेस सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीचं मूल्यमापन करण्यात येईल आणि ती संपत्ती घुसखोर आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांच्यात वाटून देण्यात येईल, असं प्तप्रधान मोदी म्हणालेत. महिलांची मंगळसूत्रं हिसकावून घेतली जातील, अशी भीतीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा 29 पटींनी वाढला भाजपा? अवघ्या 5 महिन्यांत 10 कोटींहून अधिक सदस्य, 21 राज्यांत सरकार

नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, 25 तारखेला घेणार निर्णय

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात पक्षाचा आदेश फेटाळून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काल 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. तरीही त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत 25 […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी म्हणाले, हुकूमशाहीचा खरा चेहरा समोर, काँग्रेसने सांगितली सूरतमधील भाजपच्या विजयामागील क्रोनोलॉजी

नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल सोमवारी (22 एप्रिल) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आता काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या यशाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटील ‘लिफाफा’ चिन्हावर निवडणूक लढवणार, काँग्रेसबद्दलची खदखद व्यक्त केली

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज (22 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, आणि अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. विशाल पाटील लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कोण कोणाचा एजंट हे जनतेला माहितीये’; वारंवार होणाऱ्या आरोपांवर नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार

मुंबई : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे भाजपचे एजंट आहे, अनेक महत्त्वाच्या जागांवर त्यांनी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंवर केला होता. त्यानंतर आता नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे. आज नाना पटोले अकोल्यात होते, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

अकोल्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, नाना पटोले अकोल्यात तळ ठोकून

अकोला- अकोल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येतंय. काँग्रेसनं अभय पाटील यांना दिलेली उमेदवारी ही भाजपाला पूरक असल्याचा आरोप करण्यात येतोय. अशा स्थितीत पटोले यांनीही अकोला मतदारसंघात तळ ठोकून विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर देण्याचं ठरवलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयासाठी नाना पटोले ठाण मांडून बसल्याचं सांगण्यात येतंय. नाना पटोले […]