ताज्या बातम्या महाराष्ट्र

खताच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा रांगेत उभे करणार का? : किसान सभेचा सवाल

X : @therajkaran खरीप हंगामात (Kharif sowing season) राज्यातील शेतकऱ्यांना ३८ लाख टन खताची (fertilisers) आवश्यकता आहे. पैकी सध्या केवळ ३१.५४ लाख टन इतकाच खतसाठा उपलब्ध आहे. उपलब्धता पाहता शेतकऱ्यांना यंदाही एका एका गोणीसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येईल, याकडे किसान सभेचे (Kisan Sabha) डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख आणि डॉ. अजित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उबाठा गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

X: @therajkaran मुंबई: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी (MLC Amsha Padvi) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि 10 महिला सरपंच, 48 पुरुष सरपंच, 2 जिल्हा परिषद सभापती, 2 उपजिल्हाप्रमुख, 4 पंचायत […]

महाराष्ट्र

सन २०२५ पर्यंत ७ हजार मेगावॅट क्षमतेची सौर उर्जा निर्माण करणार : राज्यपाल रमेश बैस  

X : @therajkaran मुंबई: राज्यातील कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०”, सुरु करण्यात आली आहे. याद्वारे सन २०२५ पर्यंत अंदाजे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा (solar power) निर्माण करून किमान ३० टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जाकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार: कृषीमंत्री धनंजय मुंडे 

X: @NalavadeAnant मुंबई: पीक विमा योजनेच्या (crop insurance) अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ (DBT) मिळवून देणाऱ्या अन्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रीम पीकविमा मंजूर

1700 कोटींचे वाटप तर उर्वरित 500 कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे X: @therajkaran नागपुर: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम 25% अंतर्गत आतापर्यंत 2206 कोटी रुपये अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कर्जासाठी अवयव विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ – नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी (repayment of debt) अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पण राज्यातील भाजपा सरकारला […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

अवकाळी पावसाने महाडला झोडपले

By Milind Mane Twitter : @milindmane70 महाड: संपूर्ण महाडला बुधवारी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. भात कापणी सुरू असल्याने कापलेले भात पाण्यामध्ये भिजले आहेत. या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे बुधवारी अचानक संपूर्ण महाड परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना २२४ कोटींची भरपाई देण्यास टाळटाळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई खरीप-२०२० हंगामातील एनडीआरएफअंतर्गत (NDRF) केलेले पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणेबाबत विमा कंपन्यांना कळविण्यात आले होते. मात्र, याबाबत विमा कंपन्या विविध मुद्दे उपस्थित करून नुकसान भरपाई देण्याचे टाळत आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्यांच्या कडून २२४ कोटी रुपये देय आहेत. ही बाब कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी […]