ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, भाजपाचा इतका दबाव’, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याची घणाघाती टीका

नागपूर – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा मोठा दबाव असल्यानं मुख्यमंत्री स्वताच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. सध्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या हक्काच्या १३ जागा जर ते मिळवू शकत नसतील, तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, असा सवालही जाधव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर होतोय? भाजपात येणाऱ्यांची आकडेवारी काय सांगते?

मुंबई– नरेंद्र मोदी यांचं सरकार २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशभरात भ्रष्टाचारविरोधी मोहिमेनं वेग घेतलाय. अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवाया होण्यास सुरुवात झाली. ना खाऊंगा, ना खाने दुंगा हे नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य चांगलंच गाजलंही. मात्र काळ जात गेला तसतसा या कारवाया केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरच होतायेत का, असा सवाल निर्माण होऊ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Hingoli Lok Sabha : भाजपचा दबाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला

X: @therajkaran यवतमाळ – वाशिममध्ये हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी नांदेड: भाजपच्या दबावामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार आणि हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांची याआधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. त्यांच्या जागी हिंगोली जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तळणी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव कदम कोहळीकर […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही, नारायण राणेंच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ, विरोधकांनाही टीकेची संधी

मुंबई- रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाचाच आहे, असं ठआसून सांगताना यात कुणी लुडबूड करु नये, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं. शिंदेंच्या शिवसेनेची ताकद किती आहे, असा प्रतिसवाल करत, मतदारसंघात भाजपाच वरचढ असल्याचं सांगताना राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात नसल्याचं म्हटलय. पक्षानं उमेदवारी दिली तर नक्की आपण ही जागा लढवू आणि जिंकून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाला उमेदवार मिळेना? महाजन, शेलार की अळवणी?

मुंबई – उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन कोणताही वाद नसताना, या जागेवर पूनम महाजन या विद्यमान खासदार असतानाही या जागेवर अद्याप भाजपानं उमेदवार जाहीर केलेला नाही. पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा रिंगणात उतरवण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापपर्यंत भाजपाला या जागेवरुन उमेदवार मिळत नसल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा मुंबई भाजपाचे अध्यक्ष […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले काही तास, तरीही यवतमाळमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, भावना गवळींचं काय होणार?

नागपूर- यवतमाळ वाशिम लोकोसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याचं गूढ अद्यापही कायम आहे. पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी या जागेसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास उरलेले असतानाही अद्याप याबाबत निर्णय झालेला नाहीय. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उमेदवारी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

हेमंत पाटील यांचे मुंबईत वर्षासमोर शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?

मुंबई- हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी वर्षा बंगल्याच्या परिसरात हेमंत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यापाठोपाठ हेमंत पाटील यांच्या समर्थकांनीही तिकिटासाठी वर्षा बंगल्याबाहेर शक्तिप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतंय. तर या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांनी हेमंत पाटील यांच्यावर कोणताही अन्याय […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

चंद्रपुरात मुनगंटीवारांना महायुतीतूनच आव्हान?, का संतापलेत मुनगंटीवार?

नागपूर – चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार असलेले भआजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मतदारसंघात महायुतीतूनच बळ मिळत नसल्याचं दिसतंय. या मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे अद्याप मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. इतकंच काय तर जोरगेवार यांचे साथीदार उघडपणे मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना दिसतायेत. याबाबत मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. काय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून किरण सामंतांची माघार? नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब?

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गट दोघेही आग्रही होते. या जागेवरुन शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपले ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर किरण सामंतांची माघार घेतल्याचं समोर आलं आहे. त्यांची पोस्ट सोशल मीडिावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला धक्का ; फडणवीस , सातपुतेविरुद्ध काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसने (Congress) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे सोलापूरचे उमदेवार राम सातपुते (Ram Satpute )यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे . काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe Patil )यांनी फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करत त्यांची गृहमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी,’ अशी मागणी […]