मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला( mahayuti )बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने मनसेच्या शिलेदाराने त्यांची साथ सोडली आहे . मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचा हात धरताच राज ठाकरेंना पक्षातून मोठा धक्का बसला आहे .
मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यातील महायुतीचं पारडं जड झालं आहे.त्यांच्या या भूमिकेचं भाजपमधून स्वागत केलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे.मात्र त्यांच्या या भूमिकेवर मनसेच्या शिलेदाराने नाराजी व्यक्त केली आहे . यावर कीर्तिकर शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे . “महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं. त्यांच्या या भूमिकेमुळेच मी राजीनामा देण्याचा मोठी निर्णय घेतला आहे.असे त्यांनी म्हटले आहे
याआधी पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप-मोदी शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं आणि आज अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी राजसाहेबांनी भूमिका बदलली आहे . त्यांच्या या भूमिकेचा महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची काहीच शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही. असं म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे . आता त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे .