ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची ख्याती आता धमकी बहाद्दर अशी झालीय ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे जोरदार खटके उडताना दिसत आहेत . राष्ट्रवादीत बंड करून भाजप सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांनी २०१९ साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले यावरून बोलताना आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील २८ छोटी मोठी धरणे कोरडी; तरीही प्रचारातून पाण्याचा मुद्दा गायब

X: @therajkaran महाराष्ट्रात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे.अशातच राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याअभावी पाणीपुरवठा अनेक छोटी मोठी धरणे कोरडी पडू लागली. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी याकडे कानाडोळा केल्याने याचे अतिशय गंभीर व थेट परिणाम प्रत्यक्ष मतदानावर दिसून येतील असा गंभीर इशारा एका नावाजलेल्या राजकीय नेत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये बविआ रिंगणात; आमदार राजेश पाटील यांचा अर्ज दाखल

X : @ajaaysaroj मुंबई: शिवसेना भाजपचा पालघर लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसताना आज बहुजन विकास आघाडीची राजेश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. महाविकास आघाडीने इथून भारतीताई कामडी यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीमध्ये या जागेवरून घमासान सुरू असल्याने महायुती उमेदवार उभा न करता बविआच्याच उमेदवाराला पाठिंबा देते का अशी चर्चा देखील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या ” ; छगन भुजबळांचा पंकजा मुडेंना टोला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकमधून मी प्रीतम मुंडेंना उभी करेन असं वक्तव्य केल होत . त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांनी त्यांना तुम्ही नाशिकपेक्षा बीडकडे लक्ष द्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत नवा ट्विस्ट, नाशिकमधून प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महायुतीत नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय . या मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीर माघार घेतली होती . भुजबळांच्या घोषणेनंतर महायुतीकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच निर्माण झाला होता .आता भाजपकडून प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिक लोकसभा […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन अमित शाह आणि शरद पवारांत जुंपली, शाह म्हणाले माफी मागा, पवारांचं काय उत्तर?

मुंबई- लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगत चाललेला दिसतोय. पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानानंतर सत्ताधारी भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसही मुस्लीमधार्जिणी असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केलीय. राम मंदिराला (Ram temple) काँग्रेस (Congress) आणि इंडिया आघाडीनं विरोध केल्याचं ते आता सभांमध्ये सांगतायेत. काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादाचं दिल्लीत ऐकतंय कोण ? ; भारतरत्न देण्याच्या घोषणेवरून जयंत पाटलांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ( Sharad Pawar Group)आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रकाशित करण्यात आला. त्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील( Jayant Patil )यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आश्वासनावर निशाणा साधला आहे . त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

पाच वर्षांत कोणतंही पद नसताना पंकजा मुंडेंच्या संपत्तीत 10 कोटींनी वाढ, किती आहे पंकजा मुंडेंची संपत्ती?

बीड – पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमधून भाजपाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर, गेली पाच वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं. पाच वर्षांच्या काळात विधान परिषद, राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांचा हा वनवास संपलेला दिसतोय. मात्र या पाच वर्षांच्या काळातही त्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; घरगुती गॅससह, महिलांना सरकारी नोकऱ्यांबद्दल आश्वासन !

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha election) विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा (Sharad Pawar Group Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे . त्याला ‘शपथनामा’ असं नाव देण्यात आलं आहे. या शपथनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘ज्यांना घरातील मंगळसुत्राचा सन्मान ठेवता आला नाही..’, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची काय टीका?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सध्या राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतायेत. काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीची मोजणी करुन ती संपत्ती घुसखोर आणि मुसलमानांमध्ये (Muslim) वाटून टाकतील, असं नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून सांगतायेत. इतकंच नाही तर महिलांची मंगळसूत्रंही काँग्रेसवाले नेतील, असा आरोप […]