मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसबाबत केलेल्या एका वक्तव्यानं सध्या राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यावर जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतायेत. काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर जनतेच्या संपत्तीची मोजणी करुन ती संपत्ती घुसखोर आणि मुसलमानांमध्ये (Muslim) वाटून टाकतील, असं नरेंद्र मोदी प्रचार सभांमधून सांगतायेत. इतकंच नाही तर महिलांची मंगळसूत्रंही काँग्रेसवाले नेतील, असा आरोप मोदीांकडून करण्यात येतोय. मोदींच्या या वक्तव्यांना काँग्रेस आणि इंडिया आघाडीतून तितकंच जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय.
मंगळसूत्र तुमच्यामुळे गहाण- संजय राऊत
पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार सचारा घेतला आहे. ज्यांना आपल्या घरातील मंगळसूत्राचा सन्मान ठेवता आला नाही, त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं, अशी खोचक टीका राऊत यांनी पंतप्रधानांवर केली आहे. तसंच मोदी सरकारच्या काळात अनेक घरांमधील महिलांना मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आली, अशी टीकाही त्यांनी केलीय. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळं अनेक घरांत असे प्रकार घडल्याचं राऊत म्हणालेत.
आईचं मंगळसूत्र देशासाठी बलिदान- प्रियांका
या वक्तव्याचा प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात मंगळसूत्र विकलं होतं, हे सांगतानाच त्यांनी भावनिक वक्तव्यही केलंय. त्यांची आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मंगळसूत्र देशासाठी बलिदान केल्याचं प्रियांका म्हणाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्याची निवडणूक आयोगानंही (Election Commission) दखल घेतली आहे.
हेही वाचाःप्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभी करेन, काय म्हणाल्यात पंकजा मुंडे?