महाराष्ट्र ताज्या बातम्या

नुसते खोके आणि जाहिराती, कधी होणार पद भरती?

X: @NalavadeAnant विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शुक्रवारी सातव्या दिवशीही विधिमंडळ परिसरात विरोधक राज्यातील वाढती बेरोजगारी, पेपरफुटी, पदभरती प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “नुसत्या घोषणा आणि जाहिराती,  कधी होणार पद भरती” “सरकार देतय आश्वासने खोटी, प्रत्येक परीक्षेत पेपरफुटी” अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.  याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर वडे तळत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे लोकसभा पोटनिवडणूक बाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका विसंगत: मुंबई उच्च न्यायालय

X: @therajkaran पुणे: पुण्याची जागा रिक्त झाल्यानंतर अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे आयोगाची भूमिका विसंगत आहे वाटते, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कोणतेही प्रशासकीय किंवा तिजोरीवर भार येत असल्याचे कारण दिलेले नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दणका देत, नागरिकांना प्रतिनिधी विना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पीक विमा कंपन्यांचा कोट्यवधीचा फायदा; यात कोणाला हिस्सा मिळाला? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

X: @therajkaran महाराष्ट्रातील शेतक-यांवर अस्मानी सोबत सुलतानी संकटही घोंघावत आहे. पंधराशे शेतकरी आत्महत्या या सरकार काळात झाल्या. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये तीन मराठवाड्यात होत आहेत. एक रुपयात विमा योजना असे जाहीर केले. मात्र, लाभ विमा कंपन्यांचा झाला. आठ हजार कोटी रुपये सरकारने विमा कंपन्याना दिले. मात्र, कंपन्या शेतक-यांशी मूजोरपणे वागतात. पैसे घेतल्याशिवाय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मध्यान्ह भोजनातून विषबाधा; सरकारला धरले धारेवर

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम पंचवीस जिल्ह्यांत पूर्ण झाले आहे. या महिनाअखेर ते सर्व जिल्ह्यांत पूर्ण होईल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चेंबूर, मुंबई येथील महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा या संबंधीच्या प्रश्नाला प्रश्नोत्तर तासात दिले. यावेळी गृहविभागाकडून फोरेन्सिक अहवाल शिघ्रातिशिघ्र मागवू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई द्या : अंबादास दानवे

X: @NalavadeAnant नागपूर: केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांवर आघात झाला आहे. सरकारने याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी केली आहे. गारपीट अवकाळीचा (unseasoned rain) फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक फळबाग यांचे नुकसान झालं आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

X: @therajkaran नागपूर: शिवसेना आमदार अपात्रतेविषयी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्यापुढे पुढील सुनावणी आजपासून येथे सुरू झाली. पत्रकारांशी आज ७ डिसेंबर या दिवशी अनौपचारिक संवाद साधतांना, राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानसभा सदस्य म्हणून अपात्र झालेली व्यक्ती विधान परिषद निवडणूक लढवू शकते; मात्र तीस वर्षे पूर्ण वयोमर्यादा आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गंभीर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशद्रोहयाच्या मांडीला मांडी लावून बसले; अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

X: @therajkaran नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सदस्य माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसण्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी सदस्यांनीच मलिक यांच्या विरोधात पूर्वी केलेल्या वक्तव्यांचे स्मरण करून दिले. यावर गृहमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अबब ! ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

X: @therajkaran नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४८ हजार ३८४.६६ कोटी इतका आहे. यापैकी १९ हजार २४४.३४ कोटी रुपयांच्या च्या मागण्या अनिवार्य खर्च, ३२ हजार ७९२.८१ कोटींच्या विविध कार्यक्रमांतर्गत, तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाचे कार्यालयही बंडखोर गटाच्या ताब्यात

X: @NalavadeAnant नागपूर: नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला येथील विधिमंडळातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी बहाल केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चार महिन्यांपूर्वी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल ४३ आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटून (Split in NCP) सत्ताधारी […]