ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ते वृत्त चुकीचं, 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम!

मुंबई कांदा निर्यातबंदी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायलं मिळालं होतं. मात्र ते वृत्त चुकीचं असून ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम असल्याचं केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्यांकडून सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण कोर्टात टिकेल यात शंका’, राज्य सरकारच्या विधेयकावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला. मात्र त्याचा पुढचा मार्ग सोपा नसल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर शरद पवारांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले की, कायदेशीर सल्लागारांच्या […]

महाराष्ट्र

विदेशात जाण्यापूर्वी उत्तर पूर्वेचे सौंदर्य पाहण्याचे  राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

X : @therajkaran मुंबई: अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस तोड देणारे आहे. पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर तेथील पर्यटन वाढेल व लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल […]

महाराष्ट्र

सन २०२५ पर्यंत ७ हजार मेगावॅट क्षमतेची सौर उर्जा निर्माण करणार : राज्यपाल रमेश बैस  

X : @therajkaran मुंबई: राज्यातील कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०”, सुरु करण्यात आली आहे. याद्वारे सन २०२५ पर्यंत अंदाजे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा (solar power) निर्माण करून किमान ३० टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जाकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी […]

महाराष्ट्र

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण…..!

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण न देता शिक्षण, शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये वेगळे १० टक्के आरक्षण देणाऱ्या विशेष विधेयकास मंगळवारी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात विधिमंडळात एकमताने चर्चेविना मान्यता देण्यात आली. त्याचवेळी राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाचीही अट घातली आहे. या अटीमुळे ज्या व्यक्ती किंवा समूह उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या नाहीत […]

महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार!

X : @milindmane70 मुंबई: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली आहे, सगेसोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवे आहे अन्यथा पुन्हा आंदोलन करू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याचे संकेत राज्यभरातील मराठा समाजातील नेत्यांकडून ऐकण्यास मिळत आहे. राज्य सरकारने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स’; विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई आज विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी न्यायालयात हे आरक्षण टिकणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यापुर्वी दोन वेळा निवडणुकीच्या तोंडावर असाच प्रयत्न झाला होता. मराठा समाज मागास असण्याला आधार काय? मागास आयोगाने घाईघाईत केलेलं सर्व्हेक्षण, १० टक्के आरक्षणाच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह, ५० टक्क्यांहून अधिकच आरक्षण कोर्टात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं?’ राज ठाकरेंचा सवाल

मुंबई आज विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात १० टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र ५० टक्क्यांच्या वर गेलेलं हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर जरांगे पाटील ठाम, आंतरवालीत उद्या बोलावली बैठक

जालना विधिमंडळात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केलं असलं तरीही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असून यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून […]