मुंबई ताज्या बातम्या

‘आरे’वर मुख्यमंत्री फडणवीसांचे दावे दिशाभूल करणारे; शिवसेनेचा आरोप

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड आणि झाडतोडीबाबत केलेले दावे अपूर्ण, दिशाभूल करणारे आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचा आरोप शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी केला आहे. फडणवीस यांच्या अलीकडील मुलाखतींमध्ये सातत्याने चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावा करत त्यांनी वस्तुस्थिती मांडणारी सविस्तर टिपण्णी प्रसिद्ध केली आहे. अखिल चित्रे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस सतत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Elections: “कष्टकऱ्यांची लुंगी… ठाकरे बंधूंची पुंगी वाजवणार!” – भाजपचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांचा हल्लाबोल

मुंबई : “भारताच्या कष्टकरी जनतेचा पोशाख असलेली लुंगी ठाकरे बंधूंची पुंगी वाजवल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते निरंजन शेट्टी यांनी केला आहे. रविवार, ११ जानेवारी २०२५ रोजी ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत मनसेचे स्वयंघोषित प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दक्षिण भारतीय नागरिकांना उद्देशून केलेल्या “उठाव लुंगी, बजाव पुंगी” या वक्तव्यावर शेट्टी यांनी जोरदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ZP Elections : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य २१ जानेवारीच्या  सुनावणीवर!

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य आता २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सर्व याचिकांवर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने कोणतीही मुदतवाढ मंजूर न करता सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (SEC) ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्यासाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

निष्ठा वेशीवर टांगून आश्वासनांचा बाजार……!

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीत मते मिळविण्यासाठी जवळपास सर्वच पक्षांनी निष्ठा वेशीवर टांगून विविध प्रकारची आश्वासने मतदारांना दिलेली आहेत. आश्वासने देऊन पूर्ण करणारा एकही पक्ष नाही. तरीही मतदार भूलथापांना बळी पडतात. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित आघाडी, एम.आय.एम. यासह इतर पक्षातर्फे जाहिरनामा प्रकाशित करतांना आश्वासनाचा […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : भाजपला पराभव दिसू लागल्याने प्रचारसभांमध्ये अश्लील नृत्यांचा आधार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल मुंबई – “यंदाची मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार” अशा दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेत्यांना आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भक्कम युतीमुळे आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच भाजपने मुंबईतील प्रचारसभांमध्ये बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या गायिकांच्या अश्लील नृत्यांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आखिल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी” – योगेश वसंत त्रिवेदी

मुंबई : साप्ताहिक ‘आहुति’च्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळणे ही शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागातील रोटरी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nawab Malik: तब्बल साडेतीन वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांची दणक्यात ‘एंट्री’!

कोणावर धडाडणार ‘मुलुख मैदानी तोफ’ याकडे सर्वांचे लक्ष मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना ज्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तीच ‘मुलुख मैदानी तोफ’ तब्बल साडेतीन वर्षांच्या विश्रांतीनंतर उद्या, शुक्रवारी, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा धडाडणार आहे. त्यामुळे उद्या ही तोफ नेमकी कोणावर रोखली जाणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Year-End : कोकण : प्रवास मूल्याधिष्ठित राजकारणाकडून घराणेशाहीपर्यंत

कोकणच्या राजकारणाची (Politics in Konkan) ओळख दीर्घकाळ विचार, मूल्ये आणि वैचारिक शुचिता यांवर आधारित होती. संसदेत गाजलेली बॅरिस्टर नाथ पै यांची भाषणे, मधू दंडवते यांची राष्ट्रीय पातळीवरील छाप, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांची प्रभावी राजकीय कारकीर्द, देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, संयमी नेतृत्वाचे प्रतीक असलेले सुरेश प्रभू, तसेच हुसेन दलवाई, दी. बा. पाटील, दत्ता पाटील, […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे भाजपसोबत सन्मानजनक जागावाटप झाले असले, तरी प्रत्यक्ष मैदानात शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था मुंबईत ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक २२५. जागावाटपात हा वॉर्ड भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections: भांडुप ११४: मनसेच्या अनिशा माजगावकर कोणाकडून लढणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

मुंबई: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची (Uddhav – Raj alliance) घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील (BMC elections) जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र भांडुप विधानसभा Bhandup Assembly constituency) मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११४वरून अद्याप स्पष्ट तोडगा निघालेला नसल्याने, युतीतील पहिला मोठा पेच याच प्रभागात निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अनिशा माजगावकर (MNS Leader […]