महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या

शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा आज तुकडा पडणार? अजित पवारांच्या दौऱ्यात नेमकं काय? आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश?

शिरुर- महायुतीत शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन सुरु असलेल्या गोंधळावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात कोण लढणार, हे आजच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार, याची स्पष्टता आज येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत राहणार की […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नवनीत राणा आज भाजपात प्रवेश करणार? नागपुरात पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्षांची घेणार भेट

नागपूर – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटलंय. आज नागपुरात भाजपाचा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित राहणार आहेत. नवनीत राणाही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळं या मेळाव्यात नड्डा यांच्या उपस्थितीत राणा या भाजपात येतील अशी चर्चा आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं अखेर ठरलं, वंचितला लागणार लॉटरी?, काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला, घ्या जाणून

मुंबई– महाविकास आघाडीचा बहुप्रतिक्षित जागावाटपाचा तिढा सुटल्याचं मानण्यात येतंय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. बुधवारी मविआची जागावाटपाची बैठक होणार आहे. या बैठकीत वंचितचे पदाधिकारी सहभागी होणार नसले तरी त्याच दिवशी शरद पवारांची भेट प्रकाश आंबेडकर पुण्यात घेणार आहेत. या भेटीनंतर वंचित महाविकास आघाडीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मेट्रो, कॅन्सर हॉस्पिटल, ओव्हरब्रिज, पर्यायी रस्ते, काय आहे मुख्यमंत्र्यांचं ‘मिशन कल्याण’?

कल्याण– लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याम मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावल्याचं दिसतंय. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक विकासकामांचंभूमिपूजन करतानाच, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना अश्वस्त करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय. यानिमित्तानं कल्याण-डोंबविली परिसरात मोठं शक्तिप्रदर्शनही त्यांनी घडवून आणलं. यामुळं कल्याण लोकसभा निवडणुकीत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समाजवादी विरुद्ध माजवादी अशी देशात लढाई – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना X: @therajkaran मुंबई: देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर सोपवलेली आहे. महाराष्ट्र हुकूमशाहीचं थडगं बांधेल. ही लढाई आपण एकजुटीने लढूया. शेतकरी, कामकरी, वंचित, तरुण या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : वंचितकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर, मविआसोबतच्या युतीचं काय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. वंचित आणि मविआमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान; शासकीय गटात ZP शाळा साखरा, खाजगी शाळा गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूल प्रथम

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या पहिल्या यादीतील मुंबईतील 3 उमेदवार तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जय्यत तयारीत सर्वच पक्ष व्यस्त आहेत. यात भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 195 उमेदवारांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीत आपल्या अनेक विद्यमान खासदारांना तिकीट न देण्याचा […]