मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण
Twitter @abhaykumar_d नांदेड मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा […]