महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]

मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवारांचीच – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांचीच होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार बुधवारी सकाळी असतील On Duty

Twitter : @vivekbhavsar मुंबई महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले एकमेव नेते म्हणजे अजित पवार. अजित दादा बैठकीला गैरहजर असले किंवा पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दिसले नाहीत तर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवणार – समीर भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे एक चॅलेंज असून शहरातील सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. त्यामुळे पक्ष तळागाळापर्यंत बांधण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून पुढे जाणार आहोत, अशी ग्वाही माजी खासदार व मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal takes over the charge of the President of the Mumbai Regional NCP) […]

मुंबई ताज्या बातम्या

मराठी माणूस या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.  मुलुंडमध्ये दोन दिवसांपूर्वी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपमध्ये प्रवेशासाठी एकनाथ खडसेंचा खटाटोप – गिरीश महाजन यांचा दावा

Twitter : @SantoshMasole धुळे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी कुठे कुठे जात आहेत, कोणाच्या भेटी घेत आहेत, कोणाला गळ घालत आहेत, हे मला माहीत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे, असा गौप्यस्फोट धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. खडसे भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मी हे हलकं फुलकं बोलत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रफुल्ल पटेलांनी सांगितली अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या आमदारांची नेमकी संख्या

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्रात जून अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडून हा दादा गट एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांची नेमकी संख्या किती याबाबत त्यांनी स्वतः कधी स्पष्ट खुलासा केला नाही आणि फडणवीस यनीही कधी ते जाहीर केले नाही. 40 पेक्षा जास्त आमदार […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार असून या संदर्भातील शासनाने काढलेल्या जीआरची  शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेश कार्यालयासमोर होळी करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीही […]

मुंबई महाराष्ट्र

मराठा आंदोलकांवर लाठीमार; राजकीय बळी कोणाचा जाणार?

Twitter : @milindmane70 मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरात घडलेल्या गोवारी हत्याकांडात तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे मंत्रिपद गेले होते. त्याचप्रमाणे आता जालन्यातील प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की गृहमंत्री […]