ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन शालिनीताई पाटलांनी केली नातवाची कानउघडणी

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत घमासान पाहायला मिळत आहे. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं सांगत वसंतदाद पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जर सांगलीतून उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवतील अशीही चर्चा आहे. यावर आता वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि […]

ताज्या बातम्या विश्लेषण

हितेंद्र ठाकुरांची वेगळीच चाल; पालघरच्या मैदानात उमेदवार उतरवणार!

X: @ajaaysaroj  मुंबई: महायुतीमध्ये पालघरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत (Palghar Lok Sabha election) उतरणार असल्याचे जाहीर करून एक वेगळीच चाल खेळली आहे. मात्र त्यांच्या या पवित्र्यामागे राज्य भाजपचा एक नेता असल्याचे बोलले जात असून महाआघाडीचे धाबे दणाणले आहेत.  पालघर मतदारसंघात कामे व्हावीत या एकमेव […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

मुंबई : तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेतला असून, त्यांना खरी बाजू लक्षात आणून दिली आहे. आंबेडकरांनी ही माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट केली आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडीत “जिजाऊचे “निलेश सांबरे यांना वंचीत बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha )मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . वंचितने लोकसभा निवडणूक 2024 ची आपली पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे . या यादीत जिजाऊ” चे निलेश सांबरे (Nilesh Sambare )हे अपक्ष लढणार असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. निलेश सांबरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार ; आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अनेक इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे .या मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोण असली .. कोण नकली .. हे महाराष्ट्राची जनता ठरवेल ; जयंत पाटलांचा अमित शहांवर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघातून प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथे घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर (mva )टीका केली आहे . राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते . यावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नारायण राणेंना लिड मिळाले नाही तर हिशोब करणार, नितेश राणेंचा सिंधुदुर्गात सरपंचांना इशारा

मुंबई- रत्नागिरी सिँधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी नारायण राणे यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. या मतदारसंघातून नारायण राणेंना निवडून देण्यासाठी त्यांचे पुत्र निलेश आणि नितेश हेही ठिकठिकाणी प्रचारसभा घेतायेत. त्यातल्या एका सभेत राणेंना मोठ्या लिडनं विजयी करा, असं आवाहन नितेश राणेंनी केलं. मात्र लिड कमी मिळेल त्या ठिकाणी विकास निधी कमी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेत नवा ट्विस्ट ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील शिंदे समर्थक आमदारांच्या भेटीला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची (Rajendra Patil Yadravkar) भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना त्यांनी या मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाहू छत्रपतींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपाने केले हात वर, मंडलिक आणि शिंदे उत्तर देतील; काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?

मुंबई – शाहू छत्रपती हे मूळचे कोल्हापूरचे आहेत का, ते तर दत्तक आहेत, त्यामुळं ते वारसदार नाहीत, कोल्हापूरची जनता ही खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानं वादंग निर्माण झालेला आहे. मंडलिक यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. मंडलिक यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जळगावात भाजपा उमेदवार बदलणार? उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानं कुणाला मिळणार संधी?

मुंबई- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपात पुन्हा उमेदवार बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारुन स्मिता वाघ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यामुळं नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. […]