महाराष्ट्र

स्वाभिमानी म्हणवणारे दिल्लीत भांडी घासतायत; राऊतांचा मुख्यमंत्र्यासह अजित दादांवर घणाघात

X: @therajkaran मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) निवासस्थानी झालेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. स्वत:ला स्वाभिमानी म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासत आहेत. डुप्लीकेट शिवेसना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ED : अजित पवारांनी गुडघे टेकले अन् पळून गेले, रोहित झुकणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : आमदार रोहित पवारांवर ईडीकडून (ED action against Rohit Pawar) जी कारवाई सुरू आहे, तशीच कारवाई अजित पवारांवर झाली होती. मात्र त्यांनी गुडघे टेकले आणि ते भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांचे इक्बाल मिरचीशी (Iqbal Mirchi) संबंध असल्याचे पुरावे ईडीने दाखवले होते. त्यानंतर तेही भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर त्या दोघांवरील कारवाई थांबली. अशोक चव्हाणांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

दिल्लीच्या महायुतीच्या बैठकीत जागावाटप फायनल, काय ठरला फॉर्म्युला, शिंदे-पवारांना शाहांचा काय सल्ला?

नवी दिल्ली – महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर अपेक्षेप्रमाणे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींच्या समोर सुटल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात भाजपा लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार, हे स्पष्ट झालेलं आहे. भाजपा ३४, शिंदे शिवसेना १० आणि अजित पवार राष्ट्रवादी ४ जागा लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अमित शाहा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सुधा मूर्ती यांचं राज्यसभेसाठी नामनिर्देशन, पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांची उपस्थिती…

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचं नाव शुक्रवारी राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती या प्रसिद्ध व्यावसायिक आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सासूबाई आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी समाज माध्यमावर याबद्दल माहिती दिली. पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रोहित पवारांना ईडीचा झटका!

कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त मुंबई: कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने (ED) जप्त केला आहे. या कारवाईमुळे शरद पवार व रोहित पवार यांना लोकसभेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेस धुळ्याची जागा उद्धव सेनेला सोडणार? शरद पाटील असू शकतील उमेदवार

X: @vivekbhavsar मुंबई: खानदेशातील चारपैकी धुळ्याची जागा सर्वाधिक चर्चेत आली आहे ती माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळणार की नाही यावरून. मात्र त्याहीपेक्षा भाजप आणि काँग्रेसला निवडून येईल असा उमेदवार मिळत नसल्याच्या कारणावरून ही धुळे लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या एकत्रित धुळे जिल्ह्यात काँग्रेस जवळपास नामशेष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नंदूरबारमध्ये पुन्हा हिना गावितांनाच भाजपाची उमेदवारी; पक्षांतर्गत विरोध, मात्र दावेदारी भक्कम

नंदूरबार : नंदूरबार लोकसभा मतदारसंघात हिना गावित या हॅट्रिक करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. राज्यात अनेक मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार बदलणार, अशी चर्चा असली तरी हिना गावित यांची उमेदवारी मात्र सुरक्षित असल्याचं मानण्यात येतंय. स्थानिक भाजपात त्यांच्याविरोधात धुसफूस असली तरी पर्यायी उमेदवार पक्षाकडे नाही. विजयकुमार गावित आणि हिना गावित यांचा मतदारसंघातील जनसंपर्कही मोठा असल्यानं पुन्हा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election ) घोषणा झाली नसली तरीही राज्यात प्रचार – अपप्रचाराचे जोरदार वारे वाहू लागले आहेटी. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena UBT) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चाही होऊ लागल्या आहेत. या चर्चेला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा आयात नेता धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार?

मुंबई : धुळे लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपा भाकरी फिरवणार हे स्पष्ट आहे. दोन टर्म खासदार राहिलेले सुभाष भामरे यांना भाजपा यावेळी पुन्हा तिकिट देणार नाही. त्यांच्याऐवजी भाजपात अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातही धरती देवरे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र भाजपा ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवार आयात कारणाचे संकेत मिळतायत. काँग्रेस नेते कुणाल पाटील यांना भाजपात […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

नार्वेकरांचा निर्णय आमच्या निर्देशांविरोधात आहे का? सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल

X: @therajkaran मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ‘खरी शिवसेना’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची असल्याच्या दिलेल्या निर्णयाविरुद्ध ठाकरेंच्या (Thackeray) शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील साळवे यांना आमच्या निकालपत्रात जे निर्देश देण्यात आले आहेत, त्याविरोधात निर्णय झाला आहे […]