ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे मुकाबला रंगणार का?

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानण्यात आली असून आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून (Sharad Pawar)त्यांचे निष्ठावंत शिलेदार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांच्यावरच ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे सातारच्या रिंगणात उदयनराजे विरुद्ध […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार गटाच्या पाच जागांचे उमेदवार आज जाहीर होणार ; माढ्यात अन साताऱ्यात कोणाला उमदेवारी ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला? साताऱ्यातून कोणाची वर्णी?

भिवंडी : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. आज शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र ही जागा शरद पवार गटाला दिल्यात येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भिवंडी लोकसभा जागेवरुन महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित आणि मविआमध्ये फिस्कटलं, मात्र या तीन जागांवर बिनशर्त पाठिंबा

मुंबई : गेल्या महिनाभरापासून वंचित मविआसोबत वाटाघाटी करीत होते. २४ मतदारसंघावरुन ते शेवटी वाटाघाटीत ८ जागांपर्यंत खाली उतरले होते. या दरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून वंचितला मविआमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उद्धव ठाकरेंनी तर यापूर्वीच वंचितसोबत युती केली होती. मात्र वंचित आणि काँग्रेसमध्ये वारंवार खटके उडत होते. अशाही परिस्थितीत प्रकाश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

वसंत मोरेंना वंचितकडून पुण्यात उमेदवारी, सुप्रिया सुळेंना पाठिंबा

पुणे : मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षासोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. दरम्यान वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे लोकसभेतून त्यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे वंचितकडून बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीतून वंचित उमेदवार जाहीर करणार नसल्याचं स्पष्ट झालं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लकवा मारलेला हात झालाय चांगला; पवारांचे पृथ्वीराज बाबांनाच साकडे

X: @ajaaysaroj मुंबई: ज्या पृथ्वीराज चव्हाण यांचा कायम दुस्वास केला, त्याच चव्हाणांच्या आता, साताराची सीट वाचवण्यासाठी आणि बारामतीतही त्याचा फायदा उठवण्यासाठी, नाकदुऱ्या काढाव्या लागाव्यात, अशी वेळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आली आहे. श्रीनिवास पाटील यांनी उभे राहण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर पवार गटावर आता ही जागाच काँग्रेससाठी सोडण्याची वेळ आली आहे असे बोलले जाते. त्याचप्रमाणे […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?

मुंबई– पक्षात अन्याय झाला म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी घेतला होता. आता तेच एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगतेय. खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राजकारण बरंच बदललं असल्याचं सांगण्यात येतंय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बीडमधून पंकजा मुंडेंचा गेम होणार? काय असेल शरद पवारांचा राजकीय डाव?

बीड : भाजपकडून बीड (Beed Lok Sabha Election) लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून प्रदीर्घ कालावधीनंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आहे. प्रथमदर्शनी बीडची निवडणूक पंकजा मुंडे एकहाती काढतील अशी शक्यता वर्तवली जात होती. धनंजय मुंडेही महायुतीत आल्याने त्यांना तिथून विरोध होणार नाही असंच दर्शवलं जात होतं. मात्र शरद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी होणार? मतदारांत काय प्रतिक्रिया? महायुतीला कशाचा बसू शकेल फटका?

मुंबई – राज्यात १९ एप्रिल ते २० मे या काळात पाच टप्प्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं असून, काही जागांचा तिढा येत्या काही दिवसांत सुटण्याची शक्यता ाहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवातही झालीय. मात्र तरीही संपूर्ण विजयाची खात्री दोन्ही बाजूंना देता येत नाहीये. महायुतीसमोर प्रतिमेचं आव्हान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितच तिकीट भोवल ; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून रमेश बारसकरांची हकालपट्टी

मुंबई : महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) दुसरी यादी जाहीर करत अकरा उमेदवारांना संधी दिली आहे . या यादीत मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते रमेश बारसकर(Ramesh Baraskar )यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे . त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून (Sharad […]