महाराष्ट्र ताज्या बातम्या

भुजबळांना महायुतीचा राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करणार

X: @ajaaysaroj मुंबई: नाशिक लोकसभा सीटवर छगन भुजबळ यांनी दावा सांगितला आहे. शिवसेनेएवढ्याच जागा राष्ट्रवादीला देखील देण्यात याव्यात असा आग्रहही त्यांनी केला आहे. या मागणीनंतर, केवळ लोकसभेतच नाही तर इतर बाबतीतही राष्ट्रवादी पक्षाचा योग्य मान ठेवला जाईल, असा विश्वास भाजप नेत्यांनी अजित पवारांना दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नेते भुजबळ यांना महायुतीचे राष्ट्रीय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महादेव जानकरांचं ठरलं! बारामतीऐवजी परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

मुंबई : गेल्या काही दिवसापासुन रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar)महायुतीत आल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार की परभणी लोकसभा मतदारसंघातून अशी चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महादेव जानकर हे बारामतीऐवजी परभणी लोकसभा ( Parbhani Loksabha )मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवाजी आढळराव पाटील हातात घड्याळ बांधून निवडणुकीच्या रणांगणात, आज राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून बाहेर पडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आढळराव पाटील शड्डू ठोकणार आहेत. आज २६ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याची माहिती शरद पवारांना होती का? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ पवार कुटुंबातील लढतीमुळे चर्चेत आहे. या जागेवर 2024 च्या निवडणुकीत वहिनी आणि भावजयांमध्ये लढत निश्चित मानली जात आहे. कौटुंबिक भांडणामुळे ही जागा देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. बारामतीतील निवडणूक प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत केली. यामध्ये बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी […]

महाराष्ट्र

माढ्यात शरद पवार जानकरांविरुद्ध कोणता मोहरा उमटवणार : चर्चांना उधाण

मुंबई : महायुतीमधील वादामुळे सध्या माढा लोकसभा(Madha LokSabha) मतदारसंघ भलताच चर्चेत आला आहे.महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी असेलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे महायुतीत सामील झाले आहेत . त्यामुळं आता महाविकास आघाडीवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. शरद पवार (Sharad Pawar)आता येथे कोणता डाव टाकतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शरद पवार राक्षस तर अजितदादा ब्रम्हराक्षस,बारा तारखेला फॉर्मभरून यांचे बारा वाजवणार

विजय शिवतारेंचा हल्लाबोल @ajaaysaroj बारामतीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. विजय शिवतारे यांनी बारामतीतून बारा तारखेला फॉर्म भरून पवार कुटुंबाच्या दहशतवादाचे बारा वाजवणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. शरद पवार हे राक्षस आहेत तर अजितदादा हे ब्रम्हराक्षस असून एका राक्षसाला मारण्यासाठी दुसरा राक्षस मोठा करू नका असे आवाहन राज्यातील जनतेसह महायुतीच्या नेत्यांना केले आहे. […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत आहे की नाही?, सस्पेन्स कायम? कोल्हापुरात शाहू छत्रपतींना वंचितचा पाठिंबा

मुंबई- महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच, वंचित मविआत आहे की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. २६ मार्चपर्यंत मविआच्या प्रस्तावाची वाट पाहणार असून त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून दिलेल्या उमेदवारीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी वंचित ताकदीनिशी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, आशीर्वादाचं काय?’ उमेदवारीनंतरही पंकजा मुंडेंची अस्वस्थता कायम?

बीड – बीडची भाजपाची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला, असं मानण्यात येत होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यांनी पंकजा मुंडेंची अस्वस्थता अद्यापही कायम आहे की काय, असा सवाल निर्माण झालाय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे, नगर, पाथर्डी यामार्गे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील महायुती आणि मविआचं जागावाटप कसं होणार? कोणत्या जागांवर उमेदवारांचा शोध?, कोणत्या जागांवर तिढा

मुंबई- लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडा उलटून गेला, तरी महायुतीकडून मुंबईतील केवळ दोन उमेदवारांचं नाव जाहीर झालंय. तर मविआकडून मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. मुंबईतील सहा जागांवर दोन्ही बाजूंनी तिढा असल्याचं दिसतंय. मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेनं या तिढ्यात आणखी भर पडलीय. सहा मतदारसंघात काय स्थिती? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुती आणि मविआचं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महाविकास आघाडीचं 44 जागांचं जागावाटप पूर्ण, या चार जागांवर तिढा कायम

मुंबई- महाविकास आघाडीचं 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. यात आता वंचितचा समावेश मविआत नसेल हे स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित चार जागांचा निर्णय लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. या चार जागांत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या चार जागांवर तिढा सुटला नाही तर या चारही मतदारसंघात बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण […]