मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी बारामती लोकसभा मतदारसंघ पवार कुटुंबातील लढतीमुळे चर्चेत आहे. या जागेवर 2024 च्या निवडणुकीत वहिनी आणि भावजयांमध्ये लढत निश्चित मानली जात आहे. कौटुंबिक भांडणामुळे ही जागा देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. बारामतीतील निवडणूक प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी खास बातचीत केली. यामध्ये बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले.
पक्ष फुटल्यामुळे तुम्ही भावनिक आणि राजकीयदृष्ट्या दुखावले गेले होता का?
सुप्रिया सुळे: वेळ हा सर्वावर उपाय आहे. भूतकाळात जे काही घडले, त्यासाठी मी रडत बसू शकत नाही आणि आरडाओरडू करू शकत नाही. मला पुढे जायचं आहे. मला माझ्या पक्षातील लोकांचा मोठा पाठिंबा मिळतोय. राजकीयदृष्ट्या मला जबाबदारीची जाणीव आहे. लोक खूप लक्ष देऊन ऐकतात. त्यांना आमच्याकडून आशा आहे. मी त्यांना निराश न करण्याचा प्रयत्न करतेय. हा वैयक्तिक लढा नाही. जनतेच्या सेवेसाठी आपण राजकारणात आलो आहोत.
ज्येष्ठ पवार (शरद पवार) यांनी राष्ट्रवादी आणि कुटुंबातील फुटीबद्दल वैयक्तिकरित्या कशी प्रतिक्रिया दिली?
सुप्रिया सुळे : शरद पवार वैयक्तिक जीवनात जसे आहेत, तसेच सार्वजनिक जीवनात वागतात. ते भूतकाळाकडे फारसं लक्ष देत नाहीत. सद्यपरिस्थिती ते लगेच स्वीकारतात आणि पुढे सरकतात. ते व्यावहारिक आहे, त्यामुळे ही बाब त्यांना निर्णय घेण्यास मदत करते.
2019 मधील अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याची माहिती शरद पवारांना होती का?
सुप्रिया सुळे : आम्ही भाजपशी चर्चा करत आहोत हे आम्ही कधीच नाकारले नाही, पण चर्चा आणि शपथविधी या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आम्ही शपथविधीला (2019 मध्ये) पाठिंबा दिला असता, तर आम्ही त्यांना (अजित पवार) मागे घेण्यास का सांगितले असते? 2023 मध्ये जे झाले ते 2019 मध्ये झाले असते. त्या शपथविधीला शरद पवारांनी पाठिंबा दिला असता तर आम्ही विरोध का केला असता? भाजपशी चर्चा सुरू होती का? होय. आम्ही याचा विचार करत होतो का? होय. पण, आम्हाला शपथेबद्दल सांगितले होते? उत्तर नाही आहे. आम्हाला पाठिंबा दिला असता तर आम्हीही त्यांच्यासोबत गेलो असतो.