नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी २५ मार्च रोजी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थानमधून चार आणि तमिळनाडूतून एका उमेदवाराचा समावेश आहे. कोटामधून प्रल्हाद गुंजल, अजमेरहून रामचंद्र चौधरी, राजसमंदहून सुदर्सन सिंह रावत, भीलवाडाहून दामोदर गुर्जर यांना तिकीट देण्यात आलं आहे.
गुंजल या राजस्थानातील भाजप नेत्री आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय आहेत. ते दोन वेळा कोटा उत्तरमधून आमदार राहिले आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हाडौती मतदारसंघात काँग्रेसला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय काँग्रेसने तमिळनाडूतील तुरुनलवेलीमधून सी रॉबर्ट ब्रूस यांच्या नावाची घोषणा केली आहे. आतापर्यंत काँग्रेसने देशभरातून १९० उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेसने राज्यातील चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीता चंद्रपूर जागेवरुन प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर जिंकले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात सुरेश यांचं निधन झालं. काँग्रेसने २३ मार्च रोजी ४५ नावांची घोषणा केली होती.
राजस्थान – (4)
कोटा – प्रल्हाद गुंजल
अजमेर – रामचंद्र चौधरी
राजसमंद – सुदर्सन सिंह रावत
भीलवाडा – दामोदर गुर्जर
तमिळनाडू
तुरुनलवेली – सी रॉबर्ट ब्रूस
लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसच्या १२ उमेदवारांची यादी…
नागपूर -विकास ठाकरे
रामटेक – रश्मी बर्वे
भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव किरसान
नंदुरबार – गोवळ पडवी
अमरावती – बळवंत वानखेडे
नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण
लातूर – शिवाजीराव काळगे
सोलापूर – प्रणिती शिंदे
पुणे – रविंद्र धंगेकर
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर