लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला आणि मविआला किती जागा मिळणार?आचारसंहितेपूर्वी सर्व्हेंचे काय आहे अंदाज? फडणवीस म्हणतात..
मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा […]