ताज्या बातम्या महाराष्ट्र

रायगडसाठी तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ; अजितदादांचा पहिला उमेदवार जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना, भाजप आणि अजित पवार गटात मतभेद सुरू आहेत . अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिला उमेदवार रायगड जिल्ह्यातूनच (Raigad Loksabha)जाहीर केला आहे. या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांना उमदेवारी देण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांच्या या भूमिकेवर आता शिंदे गट आणि भाजप काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे .

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार आहे.महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नेमक्या किती जागा मिळणार, याबाबत नेमका आकडा समोर आलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा या मतदारसंघासाठी आग्रही आहे. येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला.

या निवडणुकीसाठी एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे 99 टक्के काम झाले आहे . मात्र 28 तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार आहे. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत असे त्यांनी सांगितले .तसेच शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. इतर उमेदवारांची नावे 28 तारखेला जाहीर करण्यात येतील.प्रचार नियोजन, महायुती उमेदवार तिथे समन्वयक ठरवण्यात आले. मतदानाचे पाच टप्पे असून, वेळ आहे त्याचा चांगला वापर करा. २८ तारखेपर्यंत अंतिम फॉर्म्युला जाहीर होईल. सभा नियोजन करा, खोटा प्रचार रोखा अशा सूचना अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात