मुंबई : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात जोरदार राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे . या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये (Congress) नाराजीचा प्रचंड सूर पसरला . त्यानंतर या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील (Vishal Patil )यांनी अखेर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला .त्यांनी पक्षाकडूनही आपला अर्ज दाखल केला आहे . यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी काँग्रेसने विशाल पाटलांची हकालपट्टी करावी तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे . त्यामुळे आता याला काँग्रेस काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
संजय राऊत म्हणाले, सांगलीत गेल्या १० वर्षांपासून भाजपाचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना, मोक्याच्या ठिकाणी भाजपा किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात. असे असेल तर याला त्या पक्षाची ताकद मानत नाही. भाजपाला टक्कर द्यायची असेल तर, शिवसेनाच उभी राहायला हवी, असे आमचे धोरण आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सांगली काँग्रेसची म्हणणार्यानी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला . पक्षात कुणी बंडखोरी करून निवडणूक लढवत असेल, तर कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या पक्षचा नेता शिस्तभंग करत असेल तर पक्षाने त्याची हकालपट्टी करावी असा टोला राऊतांनी काँग्रेसला लगावला आहे .तसेच. सांगलीत कुणाची ताकत किती आहे, हे लोक ठरवते, सांगलीत आमचाच विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे . .
तसेच या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल, महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35+ आणि देशात 305 जागा मिळतील मुख्यमंत्र्यांनी रोड शो घेऊ दे नाही तर काही करु दे त्यांच्या हातात काही पडणार नाही. निवडणुकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत, त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळणारच असेही राऊत म्हणाले . दरम्यान काही दिवसांनी आता महायुतीला आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.