X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha constituency) चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार (Maha Vikas Aghadi Candidate) म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा उल्लेख करत बारामतीत बॅनर (Banner) लावण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधी सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या उमेदवारीचा स्टेटस ठेवला होता. असे असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकले आहेत. ज्याच्यावर ‘उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळे आणि निशाणी तुतारी फुकंणारा माणूस’ असा उल्लेख करण्यात आला आहे. याच बॅनरवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याचा अंतिम निर्णय झालेला नाही. असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची महायुतीकडून बारामती लोकसभेकरिता उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.