X : @therajkaran
मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार व्यक्त केले.
एक्स समाज माध्यमावर बावनकुळे यांनी फडणवीस यांचे आभार व्यक्त करताना लिहिले की, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस मोलाचा ठरला आहे. महाराष्ट्र आणि माझा बळीराजा अधिक सुखी होईल. राज्यातील असंख्य शेतकर्यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ती आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
सुमारे ९००० मे. वॉट सौरऊर्जेसाठी (Solar power) विकासकांना देकारपत्र (Letter of Award) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून ४०,००० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे पुढच्यावर्षी ४० टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकर्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.
Also Read: पवारांसारख्या मोठया नेऱ्याने साध्या आमदाराला धमकी देणं योग्य नाही : फडणवीस