नागपूर
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले
नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहे, ते कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहित नाही. परंतु माझ्या संपर्कात नाहीत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे, कुणालाही नाही म्हणणार नाही. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतचही असेच आहे, असेही ते म्हणाले.
भाजपाचा कार्यकर्ता व्यथित होत नाही
कुणीही आमच्या पक्षात आले तरी कार्यकर्ता व्यथित होत नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही.
टिकणारे आरक्षण मिळेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत शपथ घेतली होती. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागावाटप अद्याप निश्चित झाले नाही, उमेदवारीची चर्चा नाही. महायुतीचे तीनही नेते बसतील आणि त्यानंतर जागा वाटप ठरेल, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी ते राहुल गांधींबद्दलही वक्तव्य केलं. राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदींचा जयघोषच होणार, असंही ते म्हणाले.