ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती घराण्याचा अपमान जनता सहन करणार नाही ,याला कोल्हापूरची जनताच उत्तर देईल ; सतेज पाटलांचा हल्लाबोल

मुंबई ; लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे . कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती(Shrimant Shahu Chhatrapati) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे . आताचे महाराज हे कोल्हापूरचे महाराज आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आले आहेत असे त्यांनी म्हटले आहे .यावरून आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil )यांनी संजय मंडलिक यांना जोरदार फटकारले आहे. मंडलिकांनी छत्रपती घराण्याचा केलेला अपमान जनता सहन करणार नाही ,याला कोल्हापूरची जनताच उत्तर देईल . स्वत:च्या स्वार्थासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत, सुरुवात त्यांनी केलीय, शेवट कोल्हापूरची जनता करेल अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल चढवला आहे

दरम्यान खासदार संजय मंडलिक यांच्या वक्तव्याने कोल्हापुरात शाहूप्रेमीसह जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर त्वरित माफी मागावी .आपल्यावर एक लाखांचं लीड पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून अशी वक्तव्य केली जात आहेत . या वक्तव्याचे प्रायश्चित्त कोल्हापूरची जनता त्यांना नक्की देईल. आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेकरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेत याबाबत खुलासा करावा. वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही या सगळ्याचा शेवट मात्र कोल्हापूरची जनता करेल, कोल्हापुरी भाषेत उत्तर द्यायची वेळ आल्यास देतील, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे

त्यानंतर ते म्हणाले की, मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. त्यांची वक्तव्ये पब्लिक डोमेनमध्ये आहेत, मग आता त्यांना चिट्टी कोणी लिहून दिली का? असा टोला त्यांनी लगावला.कोण सल्लागार आहेत माहीत नाही की स्वत: आहेत माहीत नाही. कुस्ती करा पण खालच्या पातळीवर टीका योग्य नसल्याचे सतेज पाटील म्हणाले आहेत

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात