मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर झालेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar )यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samruddhi Mahamarg) बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. याच शेतकऱ्यांच्या नावावर काही नेत्यांनी कोट्यावधी रुपये हडप केलेत त्यांना मी सोडणार नाही असा हल्लाबोल तुपकर यांनी सरकारवर चढवला आहे .
या समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. रस्त्यांच्या कामाची 2 हजार 400 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे, कमी किमतीची निविदा फुगविण्यात आली आहे. सत्ताधारी यातून मलिदा खाल्ल्याने रस्त्यावर खड्डे पडल्याचे तुपकर यांनी म्हटले . त्यांच्या अशा कामामुळेच अनेकांचे जीव गेल्याचा घणाघाती आरोप ही त्यांनी केला आहे . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या प्रकल्पात शेतजमिनी गेल्या आहेत. . या प्रस्थापितांशी माझी लढत असून यात मी जिंकणार असल्याचं तुपकर म्हणाले आहेत. मात्र, यामुळे पुन्हा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून ‘ते’ प्रस्थापित कोण? याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . बुलढाण्यातून लोकसभा लढवण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही जोरदार तयारी केली आहे .सलग तीन टर्म खासदार असलेले महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprao Ganpatrao Jadhav )यांच्या विरोधात तुपकर यांनी दंड थोपटले आहेत .ते म्हणाले , बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samr आहेत. दरम्यान सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी लढत असून ही लढत सामान्य जनता विरुध्द नेता अशी आहे. तर कोणी फक्त भूमिपुत्र गाडीवर लिहले म्हणून तो भूमिपुत्र होत नाही. ते आपल्या कामातून दाखवून द्यावे लागते. तर तीन वेळा खासदार असणाऱ्या नेत्याने शेतकऱ्यांचे किती प्रश्न सोडवले. किती प्रश्न संसंदेत मांडले? असा सवाल तुपकर यांनी याआधी माजी खासदार जाधव यांना केला होता .तसेच आपली लढत प्रतापराव जाधवांशी नसून प्रतापरावांची लढत आपल्याशी असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं आहे. तर आपल्याला जनतेतून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, अशी टीका तुपकरांनी केली आहे. आता या मतदारसंघात शेतकरी पुत्र बाजी मारणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .