ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली : विजय वड्डेटीवार 

X : @NalavadeAnant

नागपूर

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले.

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोना काळात (corona pandemic) तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली. ते म्हणाले, संसदेत खासदारांचे निलंबन (Suspension of MPs), हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज (Maratha community), ओबीसी समाज (OBC Community) यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. आज राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह असून सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना या फसव्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाकडे (winter session) राज्यातील शेतकरी, सर्वसामान्याचे डोळे लागले होते. मात्र, या सरकारने सामान्य जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे अशी खरमरीत टीका करत वड्डेटीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. याप्रसंगी सर्व विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

विधिमंडळ परिसरात विरोधक विविध प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत” कापूस सोयाबीन भाव दिला का ? नाही, नाही, नाही. भाताला भाव मिळाला का? नाही, नाही, नाही, धानाला भाव मिळाला का ? नाही,नाही,नाही असं म्हणत सगळ्या घटकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनेही केली. 

नागपूर येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केले. हाताला काळी फीत बांधून, हातात घोषणांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात