X : @NalavadeAnant
नागपूर
एखाद्या अधिवेशनात आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या विभागांचा पूर्ण तब्बल एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास कधी वाट्याला आला असे आज तरी दिसून आलेले नाही. मात्र मंगळवारी येथे सूरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी सकाळी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याच अखत्यारीतील विभागांचे तब्बल २२ प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संयुक्त महाराष्ट्र (Samyukta Maharashtra) झाल्यानंतर आजपर्यंतच्या राज्य विधिमंडळाच्या तिनही अधिवेशनात विविध विभागांचे मंत्री व मुख्यमंत्री यांच्या विभागांचे प्रश्न सर्वपक्षीय आमदार उपस्थित करत असतात. त्यांना त्या – त्या विभागांचे मंत्री व मुख्यमंत्री उत्तरे देत असतात. मात्र, आजपर्यंत कधीही कोणत्याही मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांचेच प्रश्न कधी पुर्ण प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आले असे कधी दिसून आले नाही. पण आज तसे प्रश्न उपस्थित करुन उत्तरे देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
या प्रश्नांना नगरविकास विभागाचे अधिवेशन काळाकरीता प्रभारी मंत्री म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) व परिवहन मंत्री म्हणून सार्वजानिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांनी मुद्देसूद व सविस्तर उत्तरे दिली.