मुंबई
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. याच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी या घटकपक्षातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर येणार होते. मात्र दौऱ्यामुळे त्यांना शक्य न झाल्याने पक्षाचे उपाध्यश्र धैर्यवर्धन पुंडकर मविआच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थिती राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थितीत राहणार आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.
या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरही चर्चा होणार आहे.
मुसलमानांनो, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाऊ नका – प्रकाश आंबेडकर
आपल्याला काँग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये.आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल.राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत होताना दिसत नाही’. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुस्लिम संवाद सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.