ताज्या बातम्या अन्य बातम्या राष्ट्रीय

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्षांचा तुरुंगवास, गोपनीय सूचना लीक प्रकरणी शिक्षा

लाहोर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी प्रत्येकी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले.

इम्रान खान (वय 71 वर्षे) आणि शाह मेहमूद कुरेशी (वय 67 वर्षे) रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद आहेत. इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी हे तुरुंगातूनच कोर्टाच्या सुनावणीला हजर होते.

पीटीआय या निर्णयाला देणार आव्हान
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयकडून या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. पीटीआयने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यानुसार पक्षाची कायदेशीर टीम या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देईल. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रसारमाध्यमांना किंवा सर्वसामान्यांना सहभागी होऊ दिले नाही आणि घाईघाईत निकाल देण्यात आल्याचा आरोप पक्षाने केला आहे. पीटीआयने म्हटले आहे की मार्च-एप्रिल 2022 मध्ये जे घडले ते कोणतीही न्यायालयीन सुनावणी बदलू शकत नाही. या प्रकरणात कायद्याची चेष्टा करण्यात आली आहे. पक्षाने ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘खऱ्या स्वातंत्र्यासाठी’ मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे प्रकरण?
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना एका सार्वजनिक सभेदरम्यान गोपनीय राजनयिक कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात ही घटना घडली होती. सार्वजनिक करण्यात आलेले कागदपत्र अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाने पाठवले होते. ती कागदपत्र कथितपणे इम्रान खानकडून जप्त करण्यात आलेले नाही. गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करताना इम्रान खान यांनी आरोप केला होता की, अमेरिकेच्या इशाऱ्यावर त्यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे