वाशिम
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या वाशिम दौऱ्यावर आहेत. येथे एका पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी आणि आमच्यासोबत यावं, अशी खुली ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंना दिली आहे. उद्धव ठाकरेही आमच्याच सोबत आहेत. आता एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यायचं की नाही हे ठरवावं, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्वच नेत्यांना बाजूला सारून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, यामुळे ते मराठा समाजासाठी हिरो ठरलेत. एकनाथ शिंदेंनी सर्वांना क्लिन बोल्ड केले अशा शब्दात आंबेडकरांनी त्यांचं कौतुक केलं. आज महाविकास आघाडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी या घटकपक्षातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर येणार होते. मात्र दौऱ्यामुळे त्यांना शक्य न झाल्याने पक्षाचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर मविआच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
मुसलमानांनो, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत जाऊ नका – प्रकाश आंबेडकर
आपल्याला काँग्रेस ने हे दिलं ते दिलं म्हणून मुस्लिम मतदारांनी आता काँग्रेस सोबत जाऊ नये.आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त होईल.राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे मात्र यांच्यात जागा वाटपा वरून अद्याप एकमत होताना दिसत नाही’. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुस्लिम संवाद सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.