मुंबई : लोकसभेची रणधुमाळी(Loksabha Election )सुरु असताना आता बारामती (Baramati )लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare)अजित पवार यांच्या विरोधात(Ajit pawar) दंड थोपटत त्यांच्याच विरोधकांच्या भेटीगाठीवर जास्त जोर धरला आहे . कोणत्याही परिस्थितीत बारामती लोकसभा लढायचीच असा निर्धार शिवतारेंनी केल्याने अजितदादांच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार असल्याचे दिसत आहे.भोरचे अनंतराव थोपटे यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची (Harshavardhan Patil) ते भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे विरोधक म्हणून ओळखलं जातात.गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून त्या ठिकाणी त्यांचे विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांना निवडून आणलं होतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर नाराज आहेत.याच नाराजीचा फायदा आता विजय शिवतारे या लोकसभा निवडणुकीत घेणार आहेत . दरम्यान याआधी दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतारे यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे (Sharad pawar )विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी 40 वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बारामतीतून दंड थोपटलेल्या विजय शिवतारेंनीही अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मागितला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही अजित पवारांनी आतापर्यंत तीन वेळा आमच्या पाठित खंजिर खुपसला, आता जर त्यांनी विधानसभेला आमचं काम केलं तरच आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू असा इशाराच त्यांनी दिला होता.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोक खुश आहेत. अनेक वर्षे ती दाबून राहिली आहेत. बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. अजित पवारांनी या ठिकाणी नेक्सस तयार केलं आहे, गुंडांकडून दम दिला जातोय. त्यामुळे दोन्ही पवार आता नको असं लोकांचं मत आहे. माझा विरोध हा वैयक्तिक नसून पवार या प्रवृत्तीला आहे , अशी टीका आता शिवतारेंनी अजित पवारांवर केली आहे .