मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या(Lok Sabha Elections 2024) पाचव्या टप्प्यासाठी 49 जागांवर आज सकाळपासून मतदान (Voting) सुरू झालं आहे. या टप्प्यात 8.95 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पाचव्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या पाच केंद्रीय मंत्र्यांचं भविष्य ठरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही मतदारांच्या कसोटीवर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह-लखनऊ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी – अमेठी, केंद्रीय मंत्री कौशल किशोर – मोहनलालगंज, केंद्रीय मंत्री भानु प्रताप सिंह वर्मा – जालौन, केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती – फतेहपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत . त्यामुळे याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियुष गोयल पहिल्यांदाच रिंगणात आहेत . त्यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील उतरले आहेत. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल अशा दिग्गजांचं आज भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मतदारसंघात गुलाल कोण उधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उत्तर प्रदेशच्या झाशी लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अनुराग शर्मा यांना तिकीट दिलं आहे. ते श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा. लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. अनुराग शर्मा यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 212 कोटी रुपये आहे. त्यांच्या जंगम निलेश भगवान सांबरे (Nilesh Bhagwan Sambare) : नीलेश भगवान सांबरे हे महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सांबरे यांच्याकडे 116 कोटींची संपत्ती आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 695 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे