मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात मोठा दावा करत गौप्यस्फोट केला आहे . पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत आमची बैठक झाली होती, भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. त्यांचा हा दावा फेटाळत आता जेष्ठ नेते शरद पवारांनी “भाजपसोबत जाण्याचा आमची इच्छा नव्हती आणि कधीही नसणार,” असे स्पष्टच सांगितले आहे .
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार आज अहमदनगर दौरयावर आहेत . यावेळी त्याची भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरही त्यांनी टीका केली आहे ते म्हणाले , . मला भाजपचा हा नारा चुकीचा वाटतो. लोकसभेची संख्या 543 सांगितली तर मी खरी मानणार, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मी दहा वर्षात काय केलं असं विचारलं होत . त्यालाही पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. जे 2014 ते 2024 पर्यंत सत्तेत होते. ते मला जाब विचारतात. मग दहा वर्षे तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही काय केलं हे सांगायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काय केलं हे जगाला माहिती आहे,” असा टोला पवारांनी लगावला. मी 10 वर्ष सत्तेत नव्हतो. सत्तेत ते होते. 10 वर्षात त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझ्याकडे शेती खातं होतं तेव्हा मी काय केलं हे जगाला माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
याआधी देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे . त्यानंतर आता शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी आम्हा लोकांची कधीच संमती नव्हती आणि (यापुढेही) नसेल असे सांगत त्यांनी अजित पवार यांचा दावा फेटाळला आहे ..