कलकत्ता : इंडिया आघाडीशी (I.N.D.I.A. alliance) काडीमोड करीत आणि काँग्रेसचे (Congress) सर्व प्रस्ताव धुडकावून लावत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी सर्व ४२ जागांवरील उमेदवारांची (TMC Candidate) घोषणा केली. पक्षाने काही खासदारांना पुन्हा तिकीट देण्याचं टाळलं तर माजी क्रिकेटर युसूफ पठाण, कीर्ती आझाद सारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
पक्षाने आगामी लोकसभेसाठी जाहीर केलेल्या या यादीत महिलांपासून मुस्लीम उमेदवार, एससी-एसटी, ओबीसी वर्गाचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाने १६ खासदारांवर विश्वास दाखवित त्यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. तर ११ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या यादीत १२ महिलांचा समावेश आहे. याशिवाय जागावाटपात पक्षाने जातीगत समीकरणांचा विचार केल्याचं दिसतंय.
अनुसूचित जातीचे १० उमेदवार
एकूण ४२ नावांच्या यादीत १० अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती, २ ओबीसी आणि १२ महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जातीमधील ज्या उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे, त्यात कूचबिहारमधून जगदशी सी बसुनिया, जलपायगुडीमधून निर्मल चौधरी रॉय, राणाघाटमधून मुकूट मणि अधिकारी, जॉयनगरहून प्रतिमा मंडल, मथुरापूरमधून बापी हलदर, आरामबागमधून मिताली बाग, बिष्णुपूरमधून सुजाता मंडल, वर्धमानमधून डॉ. शर्मिला सरकार, बोलपूरहून असित कुमार मल आणि बोनगांवमधून विश्वजीत दास यांना तिकीट देण्यात आलं आहे.
ओबीसी उमेदवार..
पक्षाने ओबीसी समाजातून दोघांना कांथी लोकसभा जागेवरुन उत्तम बारिक आणि पुरुलिया मतदारसंघातून शांतिराम महतो यांना उमेदवारी दिली आहे.
१२ महिलांना उमेदवारी ..
कृष्णानगर – महुआ मोइत्रा
बारासात से काकोली घोष दस्तीदार
जॉयनगर (एससी) – प्रतिमा मंडल
कलकत्ता दक्षिण – माला रॉय
उलूबेरिया – सजदा अहमद
बीरभूम – शताब्दी रॉय
जादवपूर – सायोनी घोष
हुगळी – रचना बनर्जी
आरामबाग – मिताली बाग
मेदिनीपूर – जून मालिया
बर्धमान पूर्व – डॉ. शर्मिला सरकार
बिष्णुपर – सुजाता मंडल
११ नवे चेहरे..
यावेळी पक्षाने 11 नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले आहे, जे पहिल्यांदाच तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील. यामध्ये गोपाल लामा, प्रसून बॅनर्जी, शाहनवाज अली रायहान, युसूफ पठाण, रचना बॅनर्जी, मिताली बाग, देबंगशु भट्टाचार्य, कालीपारा सोरेन, सुजाता मंडल, डॉ. शर्मिला सरकार आणि कीर्ती आझाद यांच्या नावांचा समावेश आहे.