मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ( Sharad Pawar Group)आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रकाशित करण्यात आला. त्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील( Jayant Patil )यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आश्वासनावर निशाणा साधला आहे . त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे असे सांगितलं होत . यावरून आता जोरदार टीका करत जयंत पाटील म्हणाले ,, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होऊ शकते तो जाहीरनामाचा भाग होऊ शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. अजित पवार यांनी भारतरत्न बाबत मागणी केली असली तरी दिल्लीमध्ये त्यांचं फारसं कोणी ऐकत नसल्याचा टोला त्यांची अजितदादांना लगावला आहे .
याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी आम्ही पक्ष म्हणून काम करू अशी भूमिका घेण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देतो असे अजित पवार म्हणाले होते .यावरूनच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांमध्ये वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या या घोषणेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे
दरम्यान या जाहीरनाम्यावेळी पक्षप्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे . ते म्हणाले , 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात भाजपचं सरकार आहे. या काळात त्यांनी शेतीसाठी काय केलं हे सर्वप्रथम लोकांच्या समोर मांडणं आवश्यक आहे. दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून शेती विषयक प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. याबाबत सरकार काहीच बोलत नसल्याची टीका पवार यांनी केली आहे .