ताज्या बातम्या महाराष्ट्र

नाशिकच्या जागेवर कोणाची वर्णी ? हेमंत गोडसे कि अजय बोरस्ते

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरु आहे . नुकतीच या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माघार घेतली आहे . यानंतर हा तिढा सुटेल असे बोलले जात आहे. मात्र आता शिवसेना शिंदे गटातदेखील दोन गट पडले आहेत. या जागेसाठी एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी अनेक वेळा ठाणे येथे जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या घरासमोर आंदोलने केली आहेत . तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी देखील त्यांची भेट घेत नाशिकमधून लोकसभा (Nashik Lok Sabha Constituency) लढवण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे या मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच या मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या इतर प्रमुख नेत्यांची बैठकही पार पडली होती . या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असेही सांगण्यात आले होते . मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी उमदेवार जाहीर केला नव्हता . या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढे गेला आहे . जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढणार आहेत.त्यामुळे अधिक तिढा न वाढवता मी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले . आता त्यांच्या माघारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे . त्यामुळे आता महायुतीत ही जागा कोणाला सुटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .

दरम्यान दुसरीकडे या नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे.मात्र अजूनही महायुतीत जागेचा तिढा निर्माण झाला आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात