’टेडेक्स पीसीसीओईआर’ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, पुणे : “युवा हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. त्यांच्यात पारंपरिक अपेक्षा आणि जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य असते. त्यामुळे नवीन पिढीने आत्मविश्वासाने पुढे येत सामाजिक समस्यांना नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर), रावेत येथे आयोजित ‘टेडेक्स पीसीसीओईआर’ या कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषण देत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
युवकांनी नवीन विचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उपलब्ध संधींचा उपयोग करून समाजहितासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. “युवकांमधील सर्जनशीलता आणि ऊर्जा समाजाला अधिक प्रगत, न्यायसंगत आणि सक्षम बनवू शकते. मात्र, हे सर्व करण्यासाठी प्रथम स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे. युवक सक्षम झाला तरच देश सक्षम होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
▪️ कृष्णराज महाडिक (यूट्यूबर आणि स्पोर्ट्स कार रेसर) – डिजिटल माध्यमांचा योग्य वापर, त्याचे फायदे-तोटे आणि सामाजिक परिणाम यावर मार्गदर्शन.
▪️ आशिष पाटील (नृत्यदिग्दर्शक) – त्यांचा खडतर प्रवास सांगत, बिकट परिस्थितीतही ध्येय विसरू नका, असा सल्ला दिला.
▪️ सुयश टिळक (अभिनेता) – संगीत आणि अभिनय क्षेत्रातील अनुभव कथन.
▪️ मृणाल शंकर (रॅप सिंगर), मकरंद आठवले (सीए), अजिंक्य काळभोर (उद्योजक), नरेंद्र लांडगे आदींनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांसह प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख डॉ. राहुल मापारी, डॉ. त्रिवेणी ढमाले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी केले, स्वागत डॉ. राहुल मापारी यांनी केले तर आभार डॉ. त्रिवेणी ढमाले यांनी मानले.