मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर (Kolhapur Loksabha) आणि हातकणंगले लोकसभा (Hatkanangle Lok Sabha) मतदारसंघासाठी आज चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळपासून ते आता दुपारपर्यंत मतदारांच्या मोठया रांगा होत्या . दरम्यान दुपार तीनपर्येंत कोल्हापूरमध्ये 51.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर हातकणंगलेमध्ये 49.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ( shahu maharaj) आणि महायुतीचे संजय मंडलिक(sanjay mandlik ) रिंगणात आहेत . कोल्हापूर दक्षिणमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45.62 टक्के मतदान झाले होते तर कोल्हापूर उत्तर मध्ये 49.54 टक्के मतदान झाले . दरम्यान यांच्या तुलनेमध्ये चंदगड कागल आणि राधानगरी व मतदार संघामध्ये मतदानाचा वेग दुपार असूनही वाढल्याचे दिसून येत आहे. चंदगडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 51.45 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये 54.70 टक्के मतदानाची नोंद झाली, तर राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये 51.81 टक्के मतदानाची नोंद झाली आहे .दरम्यान या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी करवीरने आतापर्यंत घेतलेली आघाडी कायम आहे.
दरम्यान, कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांनी मतदानाचा वेग मंदावल्याचे लक्षात आल्यानंतर व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अजून मतदान होण्याचे गरजेचं असून राहिलेल्या तासांमध्ये ताबडतोब मतदानाला कसे येतील ते पाहावे, असे आवाहन केलं आहे.त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात किती मतदान होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .