मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची १७ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे .कारण सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आघाडीत नाराजीचा सूर पसरला आहे . सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी गेला आहे . यामध्ये विश्वजित कदम (Vishwajeet Patangrao Kadam) आणि सांगली काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे . आज दुपारी घेणार पक्षश्रेष्ठींची हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी परस्पर उमेदवार यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत नाराजी आहे. वादग्रस्त जागांबाबत आज बैठक होण्यापूर्वीच राऊत यांनी यादी जाहीर केली आहे. दरम्यान शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार होती. नाशिकसह इतर जागांबाबत आज बैठक होणार होती. या बैठकीच्या आधीच केल्याने राऊतांवर यादी जाहीर केल्याने मविआमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यानन सांगलीच्या जागेवरून आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जाऊन मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि के सी वेणूगोपाल (K. C. Venugopal) यांची भेट घेणार आहेत. सोनिया गांधी यांची संध्याकाळीपर्यंत भेट होणार आहे. वरिष्ठांच्या भेटीनंतर विश्वजीत कदम चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळण्यावर सांगलीतील काँग्रेसचे नेते ठाम आहेत. सोनिया गांधींच्या भेटीनंतर सांगलीत उद्या येऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आली आहे . .
सांगली लोकसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. आता या पुढची त्यान्ची भूमिका काय असणार त्यांच्यासमोर काय आव्हान असतील? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याआधी सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत आणि सांगलीची जागा शिवसेना लढवणार आहे. तसंच भिवंडीच्या जागेवरुन जी चर्चा सुरू होती, ती जवळजवळ संपली आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे. आमच्याकडं ए,बी,सी असा कुठलाही प्लॅन नाही असं संजय राऊत म्हणाले होते . लोकसभेच्या तोंडावर सांगली जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात ठिणगी उडाली आहे.