मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections ) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . यापार्श्ववभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही जोरदार तयारी केली आहे . या निवडणुकीत ठाकरे गटाकडून भाजपला जोरदार धक्का बसणार आहे .कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले जळगाव येथील भाजपचे विद्यमान खासदार ठाकरेंच्या गळ्याला लागले आहेत . भाजपने तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील( unmesh patil) ठाकरे गटात जाणार आहेत. ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांनाही जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे .
गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत . यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे . दरम्यान संपदा पाटील ठाकरे गटाकडून रिंगणात उतरल्यास दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. भाजप म्हणजे महायुतीच्या स्मिता वाघ (smita wagh)आणि महाविकास आघाडीच्या संपदा पाटील (sampada patil)यांच्यात लढत होणार आहे .
याआधी जळगाव लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) स्मिता वाघ (Smita Wagh) यांचे तिकीट कापून ऐनवेळी उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांना उमेदवारी जाहीर केली होती. यंदाही उन्मेश पाटील यांनाच भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, यंदा भाजपने ऐनवेळी उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आले होते . आता मात्र ते या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे