मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आता मतदारसंघातील उमेदवाराच्या यादीपाठोपाठ आता भाजपच्या (bjp )स्टार प्रचारकांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh), बिहार (Bihar) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) साठी भाजपने ही यादी जाहीर केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi), जे.पी.नड्डा, (J P Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) या नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण, रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले, अन्नामलाई यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मध्य प्रदेश तर विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, स्मृती ईराणी, मिथुन चक्रवर्ती आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.
बिहार राज्यामधील स्टार प्रचारक
नरेंद्र मोदी,जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, विनोद तावडे, सम्राट चौधर,विजय कुमार सिन्हा,गिरीराज सिंह,नित्यानंद राय,अश्विनीकुमार चौबे, दीपक प्रकाश,सुशील कुमार मोदी,नागेंद्रनाथ त्रिपाठी, भिखुभाई दलसानिया,संजय जयस्वाल,मंगल पांडे,रेणू देवी,प्रेम कुमार, स्मृती ईराणी,मनोज तिवारी,सय्यद शाहनवाज हुसेन,नीरज कुमार सिंह,जनक चमर,अवधेश नारायण सिंह,नवल किशोर यादव,कृष्ण नंदन पासवान, मोहन यादव,मनन कुमार मिश्रा,सुरेंद्र मेहरा,शंभू शरण पटेल,मिथिलेश तिवारी,राजेश वर्मा,धर्मशाला गुप्ता,कृष्णकुमार ऋषी, अनिल शर्मा,प्रमोदकुमार चंद्रवंशी, निवेदिता सिंह, निक्की हेम्ब्रोम .
पश्चिम बंगाल राज्यातील स्टार प्रचारक
नरेंद्र मोदी,जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह,अमित शाह,योगी आदित्यनाथ, हिमंता विश्व सरमा, मानिक साहा,अर्जुन मुंडा,सुनील बन्सल,मंगल पांडे, अमित मालवीय,निसिथ प्रामाणिक, सतपाल महाराज,स्मृती ईराणी, मुख्तार अब्बास नक्वी, सुकांता मजुमदार,सुवेंदू अधिकारी,शंतनू ठाकूर, स्वप्न दासगुप्ता, दिलीप घोष,राहुल सिन्हा,मिथुन चक्रवर्ती,देबश्री चौधरी,समिक भट्टाचार्य,नागेंद्र रॉय,दिपक बर्मन,जगन्नाथ चट्टोपाध्याय,मफुजा खातून,सुशील बर्मन, सुकुमार रॉय, निखिल रंजन डे, मिहीर गोस्वामी, मालती रवा रॉय, डॉ. शंकर घोष, जोयल मुर्मू,गोपालचंद्र साहा,सद्रथ तिर्की, रुद्रनील घोष,अमिताव चक्रवर्ती, सतीश धोंड