ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपचे पैसे घ्या अन काँग्रेसलाच मतदान करा ; दिनकर मानेंच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

मुंबई :लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचे खटके उडत आहेत .अशातच आज.शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने (Dinkar Mane) यांनी पंतप्रधान मोदी, अजित पवार, अशोक चव्हाणांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे म्हणत सुटला आहे. संन्याशी आहे म्हणे एक बायको सांभाळता आली नाही आणि देश सांभाळायला निघाला आहेस. अशा खालच्या भाषेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi)टीका केली आहे . तसेच भाजपचे लोक पैसे घेऊन आले तर पैसे घ्या आणि काँग्रेसलाच मतदान करा, असा अजब सल्लाही दिनकर मानेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे .त्यांच्या या अजब वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे .

दरम्यान येत्या 7 तारखेच्या आगोदर पंधरा लाख रुपये आमच्या खात्यावर टाका आम्ही तुम्हाला मतदान करू. लोकांनी आता भरपूर सहन केलं आहे. तीन महिन्याला दोन हजार रुपये देतो, म्हणून मोदी सांगतंय हरामखोर का? घरचं देत नाही. Dap खतांवर , पनीरवर GST लावली आहे. अरे कशा कशावर GST लावतोस अशा शब्दात त्यांनी पंतप्रधांनावर हल्लाबोल चढवला आहे . तसेच राष्ट्रवादीत बंड करून भाजपमध्ये सामील झालेल्या अजित पवारांवर
(Ajit Pawar) बोलताना त्यांनी 70 हजार कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या अजित पवार यांना भाजपनं महायुतीमध्ये घेतलं आहे, त्याला का घेतलं? असा प्रश्न उपस्थित करत धरणात पाणी कमी आहे, म्हणून घेतलं का? असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे .

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आता गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी करून जोरदार तयारी केली जात आहे. यावेळीकार्यकर्त्यांसोबत बोलताना उबाठाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख दिनकर माने यांनी अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांनाही टोला लगावला आहे. त्यासोबतच अशोकराव चव्हाण यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केलं तरी ते भाजपमध्ये गेले, अरे तुझ्यापेक्षा आम्हीच फाटके चांगले आहोत की…”, असं म्हणत जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे कोणी दिले, तरी घ्या कोणी शपथ दिली तर शपथ घ्या, पण काँग्रेसलाच मतदान करा, असं धक्कादायक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना पैसे घेण्याचा सल्ला माने यांनी दिला आहे . त्यांच्या या वक्तव्याने राजकीय घुमसान उठणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात